शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रामनगर पोलीस कचेरीवर बुधवारी धडकणार नागरिकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:48 IST

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून आपल्याला तुरंगात डांबले. हा प्रकार निंदनिय असून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवार ३० मे रोजी स्थानिक आर्वी नाका चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनिहाल पांडे : सचिन यादव यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून आपल्याला तुरंगात डांबले. हा प्रकार निंदनिय असून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवार ३० मे रोजी स्थानिक आर्वी नाका चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा रामनगर पोलीस कचेरीवर धडक देणार असून यावेळी आपण सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणार आहो, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी दिली.निहाल पांडे पुढे म्हणाले, स्थानिक तुकाराम वॉर्ड परिसरात काहींनी २३ मे रोजी रात्रीला हिवंज नामक तरुणाशी वाद केला. यावेळी हिवंज नामक तरुण जखमी झाला. या प्रकरणात आपला कुठलाही संबंध नसताना रामनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी आपल्यावर गुन्हे दाखल करून आपणास तुरुंगात डांबले. इतकेच नव्हे तर याप्रसंगी यादव यांनी आपल्याला श्रीमुखात लगावत जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली. इतक्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी आपल्याला ताब्यात घेतल्यानंतर साधे कुटुंबियांनाही फोन करू दिला नाही. तसेच अटक करून तुरुंगात डांबल्यानंतर उपाशी ठेवत साधे पाणीही पिण्यासाठी दिले नाही. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निहाल पांडे यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नसल्याबाबतचे शपथपत्र न्यायालयात तक्रारकर्ता हिवंज यांनी सादर केले आहे.इतकेच नव्हे तर पोलीस अधीक्षकांनाही घटनेची वास्तविकता तक्रारकर्त्याने स्वत: सांगितली आहे. यादव यांच्याकडून करण्यात आलेले मारहाण व जीवेमारण्याची धमकी हा प्रकार निंदनिय आहे. माझ्या जीवाला यादव यांच्याकडून धोका असून त्यांच्याविरोधात आपण ३० रोजी मोर्चादरम्यान पोलिसात तक्रार सादर करणार आहो, असेही यावेळी निहाल पांडे यांनी सांगितले.घरातून रोख व साहित्य नेले - सेलूकरस्थानिक साईनगर येथील रहिवासी असलेल्या विशाल सेलूकर यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. सेलुकर म्हणाले की, आपल्यावर पत्नीने पोटगीसाठी खटला दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना पत्नी घरी आली. ती घरी राहत असताना अचानक एक दिवस वाद झाला. त्याबाबतची तक्रार माझ्या पत्नीने रामनगर पोलिसात दाखल केली. त्यानंतर आपल्या घरी एपीआय यादव यांनी आपल्या चमुसह तसेच माझ्या पत्नीसह येत घरातील साहित्य व रोख पत्नीसमक्ष नेली. त्यानंतर आपण या प्रकरणी योग्य कार्यवाही व्हावी म्हणून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्या तक्रारीची प्रत आपण रामनगर ठाण्यात देण्यासाठी गेलो असता आपल्याला एपीआय यादव यांनी धाकदपट केली. आपणही यादव यांच्या मनमर्जी कामाचे पीडित ठरलो असल्याचे यावेळी विशाल सेलूकर यांनी सांगितले.