शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वैभवचा गौरव समितीद्वारे नागरी सत्कार

By admin | Updated: February 3, 2016 02:34 IST

गौरव समितीच्यावतीने स्थानिक गांधी चौकात शुक्रवारी सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वैभव घंगारे याचा खासदार रामदास तडस, ....

ग्रामस्थांचा उपक्रम : माता-पित्याचाही सत्कारसिंदी (रेल्वे) : गौरव समितीच्यावतीने स्थानिक गांधी चौकात शुक्रवारी सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वैभव घंगारे याचा खासदार रामदास तडस, आ. समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, प्रवीण हिवरे यांच्या शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन माता-पित्यासह गौरव करण्यात आला. याप्रसंगी भारतीय स्टेट बँक, इलाहाबाद बँक तसेच समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेकडूनही वैभवचा गौरव करण्यात आला.वैभवच्या कामगिरीने केवळ नगरीचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे नाव देशभर झळकले, अशा भावना खा. तडस, आ. कुणावार तिमांडे यांनी व्यक्त केल्या. शाळकरी मित्राला वाचविले याचा अभिमान आहे. भविष्यात सैन्यदलात भरती होऊन राष्ट्राची सेवा करण्याचे ध्येय नक्की केले, असे वैभव घंगारे याने सांगितले. तत्पूर्वी, शालेय बालकांनी उपस्थित नागरिकांचे, पथनाट्य, भारूड व मिमिक्री सादर करून मनोरंजन केले. कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, तैलिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, वर्धेचे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, म्यू. नेहरू शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कामडी, आजी-माजी नगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक आदी उपस्थित होते. शहर व परिसरातील स्त्री-पुरूष, विद्यार्थी आवर्जून हजर होते. प्रास्ताविक अमोल सोनटक्के यांनी केले. संचालन असलम पठाण यांनी केले तर आभार मुन्ना शुक्ला यांनी मानले.(प्रतिनिधी)