शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिटफंड कंपनीतील गुंतवणूकदार आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:23 IST

चिटफंड कंपन्याच्या गुंतवणूकदारांची विशेष बैठक स्थानिक महावीर बाल उद्यान परिसरात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी २६ फेब्रुवारीला मुंबई येथील सेबी भवनावर मोर्चा नेण्याचे निश्चित करण्यात आले.

ठळक मुद्देचिटफंड कंपन्याच्या गुंतवणूकदारांची विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चिटफंड कंपन्याच्या गुंतवणूकदारांची विशेष बैठक स्थानिक महावीर बाल उद्यान परिसरात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी २६ फेब्रुवारीला मुंबई येथील सेबी भवनावर मोर्चा नेण्याचे निश्चित करण्यात आले. बैठकीचे आयोजन जनलोक प्रतिष्ठान संघटना कृती समिती नागपूर, वर्धा, सेलू, हिंंगणघाट यांच्यावतीने करण्यात आले होते.सेबी या सरकारी कंपनीने देशातील लाखो कंपन्यांना अडचणीत आणून त्यांना बंद पाडले. त्यामुळे करोडो गरीब सामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसला आहे. कंपन्यामध्ये पूर्णवेळ काम करणारे सध्या बेरोजगार झाले असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. करोडो जनतेचे मोलमजुरीचे पैसे परत करण्यास सेबी टाळाटाळ करीत आहे. आजपावेतो लाखो कंपन्या बंद पाडण्यात आल्या आहेत. त्यांच्या संपत्ती हस्तगत करण्यात आली; पण गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाही, असे बैठकीदरम्यान सांगण्यात आले. गेल्या चार वर्षापासून पर्ल्स पीएसीएल, पॅन कार्ड क्लब, मैत्र्येय आदी कंपन्याच्या गुंतवणुकदारांनी जिल्हाधिकारी तसेच खासदार, आमदार यांना निवेदन देत योग्य कार्यवाही करण्यासाठी विनंती केली. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे २६ फेब्रुवारी २०१८ ला सेबी भवन मुंबई येथे देशव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले. यावेळी ज.प्र. संघटना नागपूर कृती समितीचे उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, सचिव संतुलाल भारती, ढोमणे, सुनील सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले.