शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

श्वानांच्या हल्ल्यात चितळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:27 IST

आपल्या नैसर्गिक अधिवासाची वाट चुकलेले चितळ पाण्याच्या शोधार्थ शहरालगतच्या डिगडोह रस्त्यावर आले असता दहा ते पंधरा श्वानांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान गोधंळलेल्या स्थितीतील या चितळने सरळ शहराकडे धुम ठोकून बसस्थानकाजवळील अग्रवाल धर्मशाळेत आश्रय घेतला. श्वानांच्या या हल्ल्यात जखमी झालेले चितळ निलेश येळणे या तरुणाच्या निदर्शनास येताच त्याने श्वानांच्या कळपाला हाकलून लावले.

ठळक मुद्देबचावासाठी धर्मशाळेत घेतला आश्रय

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : आपल्या नैसर्गिक अधिवासाची वाट चुकलेले चितळ पाण्याच्या शोधार्थ शहरालगतच्या डिगडोह रस्त्यावर आले असता दहा ते पंधरा श्वानांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान गोधंळलेल्या स्थितीतील या चितळने सरळ शहराकडे धुम ठोकून बसस्थानकाजवळील अग्रवाल धर्मशाळेत आश्रय घेतला. श्वानांच्या या हल्ल्यात जखमी झालेले चितळ निलेश येळणे या तरुणाच्या निदर्शनास येताच त्याने श्वानांच्या कळपाला हाकलून लावले.जखमी चितळाला ताब्यात घेत घटनेची माहिती निलेश येळणे याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. सोमवारचे सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान एक चितळ डिगडोह रस्त्यावर श्वानांच्या कळपापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सैरावैर पळत असताना नागरिकांना दिसले. शिवाय ते चितळ जखमी असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान या चितळाने शहराच्या दिशेने धुम ठोकली. तसेच स्थानिक श्यामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत आश्रय घेतला. त्यावेळी निलेश येळणे यांनी नजर त्याच्यावर पडली. निलेश याने श्वानाच्या कळपाला हाकलून लावत जखमी चितळाला ताब्यात घेत घटनची माहिती वनरक्षक सोनोने, जाकीर शेख यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमी चितळाला पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रमात उपचारासाठी पाठविले.