शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

... अन् १० मिनिटांआधीच थांबविला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:44 IST

वर्धा जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवून गावकऱ्यांसह दोघांच्याही नातेवाइकांना समज दिली.

ठळक मुद्देजिल्हा बाल संरक्षण कक्षाची कारवाई नातेवाईकांसह गावकऱ्यांना दिली समज

 लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह अमरावती जिल्ह्यातील तरोडा गावात पार पडणार होता. मात्र, विवाहाच्या अवघ्या १० मिनिटांआधीच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने विवाहस्थळी धाव घेत बालविवाह थांबवून गावकऱ्यांसह दोघांच्याही नातेवाइकांना समज दिली.

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांना मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील तराेडा गावात होत असल्याची माहिती अमरावतीचे बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी दिली. त्यांनी तत्काळ दखल घेऊन चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होऊन तेथील पोलीस निरीक्षकांना घटनेचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत विवाहस्थळ गाठले. यादरम्यान तेथे शुभमंगल गाथा सुरू होती. त्याचवेळी जिल्हा संरक्षण अधिकाऱ्यांनी विवाह थांबविला. यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकांना बोलाविण्यात आले. त्यांना सदर विवाह हा बालविवाह असल्याने वधू, वर, त्यांचे नातेवाईक, गावकरी यांची समजूत काढली.

सदर विवाहाला स्थगिती देऊन वधू, वर, नातेवाईक यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. त्यांना बाल कल्याण समिती, अमरावती यांच्यासमोर हजर करण्यात आले. बाल कल्याण समिती सदस्य मीना दंढले, अंजली घुलक्षे यांच्यासमक्ष वधू, वर , नातेवाईक, सरपंच, अंगणवाडी सेविका यांचा जबाब हमीपत्र लिहून घेण्यात आले. बालिकेला दर १५ दिवसांनी बाल कल्याण समितीसमक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

अमरावती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांच्या मार्गदर्शनात अजय डबले, मनीषा फुलाडी, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन बलिकेचा बालविवाह थांबविण्यात आला असून, महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या आदेशान्वये बाल विवाह थांबविण्याची कार्यवाही करण्यात आली.

टॅग्स :marriageलग्न