शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भूमिगत गटार वाहिनीच्या कामाला बालकामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

झाशी राणी चौक-गो.से. वाणिज्य महाविद्यालय-गांधी पुतळापर्यंतच्या मार्गावर भूमिगत गटारवाहिनीसाठी जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करण्यात आले आहे. सदर खोदकामाचे खड्डे एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारे असल्याने ये-जा करणाऱ्यांनी दक्ष राहूनच पुढील प्रवास करावा अशा आशयाचा फलक खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी कंत्राटदाराच्यावतीने लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराची मनमर्जी : कामगार अधिकाऱ्यांचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अमृत योजनेच्या माध्यमातून मोठा निधी खर्च करून शहरात भूमिगत गटारवाहिनी टाकली जात आहे. परंतु, सदर विकास काम पूर्णत्त्वास नेताना कंत्राटदाराकडून बालकामगार कायद्यालाच बगल दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर नाममात्र मोबदला देत अल्पवयीनांकडून अंगमेहनतीचे काम करून घेतले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. परंतु, त्याकडे कामगार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीविषयी नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.झाशी राणी चौक-गो.से. वाणिज्य महाविद्यालय-गांधी पुतळापर्यंतच्या मार्गावर भूमिगत गटारवाहिनीसाठी जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करण्यात आले आहे. सदर खोदकामाचे खड्डे एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारे असल्याने ये-जा करणाऱ्यांनी दक्ष राहूनच पुढील प्रवास करावा अशा आशयाचा फलक खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी कंत्राटदाराच्यावतीने लावण्यात आला आहे. परंतु, याच ठिकाणी एका अल्पवयीन मुलीकडून अंगमेहनतीचे काम करून घेतले जात असल्याचे लोकमत प्रतिनिधीच्या पाहणीत निदर्शनास आले. या विषयी अधिकची माहिती जाणून घेतली असता कुणीही बोलण्यास तयार नव्हते. तर गत वर्षभऱ्यात एकही बालकामगार वर्धा जिल्ह्यात आढळला नसल्याचे कामगार अधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, भूमिगत गटारवाहिनीचे काम पूर्णत्त्वास नेणाऱ्या कंत्राटदाराकडून अल्पवयीन मुलीकडून अंगमेहनतीचे काम करून घेतले जात असल्याने जिल्हा कामगार अधिकारी याप्रकरणी काय कार्यवाही करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.अल्पवयीनांकडून अंगमेहनतीचे काम करून घेणे गुन्हाअल्पवयीन मुला-मुलींकडून कुठल्याही प्रकारे अंगमेहनतीचे काम करून घेणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे; पण वर्धा न.प.कडून भूमिगत गटारवाहिनीचे काम मिळालेल्या कंत्राटदाराकडून याच कायद्याला सध्या फाटा दिल्या जात असल्याचे बघावयास मिळते. या प्रकरणी नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे वर्ध्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.अल्पवयीन मुला-मुलींकडून अंगमेहनतीचे काम करून घेणे हे कायदेशीर गुन्हा आहे. शिवाय ही बाब गंभीर आहे. अभियंत्यांना पाठवून पाहणी करून कंत्राटदाराला तातडीने नोटीस बजावण्यात येईल.- किशोर साखरकर प्रशासकीय अधिकारी, न.प. वर्धागत वर्षभऱ्यात एकही बालकामगार वर्धा जिल्ह्यात आढळलेला नाही. भूमिगत गटारवाहिनीचे काम बालकामगाराकडून करून घेतले जात असल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.- एम. पी. मडावी, जिल्हा कामगार अधिकारी, वर्धा.