शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गांधी जयंतीला साधणार सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:40 IST

रोजगार, आरोग्य, स्वच्छता, शिक्षणयुक्त जिल्हा आणि शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्याचा संकल्प करणारा एक भव्य कार्यक्रम होणार आहे.

ठळक मुद्देसेवाग्राममध्ये वर्धा जिल्ह्याचा कायापालट करणारा ‘संकल्प से सिद्धी’ महामेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रोजगार, आरोग्य, स्वच्छता, शिक्षणयुक्त जिल्हा आणि शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्याचा संकल्प करणारा एक भव्य कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वित्त, नियोजन व वने तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एकाच दिवशी ५ हजार ७४ कोटींच्या कामांची पायाभरणी होणार आहे. याच दिवशी बहुप्रतीक्षीत सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामांचाही शुभारंभ होणार आहे.सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाचा २६६.५३ कोटींच्या विकास आराखडयातील कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ व वर्धा जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत सुविधांमध्ये भर घालण्याचा संकल्प या कार्यक्रमात केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘संकल्प से सिद्धी’ उपक्रमाप्रमाणे सर्वकष विकासाची रूपरेषा कार्यक्रमातून ठरणार आहे. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक यांना आमंत्रित करण्यात येणार असून शहर व ग्रामविकासाचा गाडा चालविणारे सर्व कर्मचारी देखील आमंत्रित केले जाणार आहेत. याचवेळी जिल्ह्याकरिता महत्वपूर्ण असणाºया ड्राय पोर्ट, राष्ट्रीय महामार्ग, केंद्रीय मार्ग निधीच्या कोट्यवधीच्या कामांचीही पायभरणी होणार आहे. सोबतच संपूर्ण देशाला स्वराज्याचे स्वप्न जेथून पडले होते त्या महात्मा गांधी यांच्या सहवासाने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमाच्या कामाचाही शुभारंभ होणार आहे.चंद्र्रपूर येथे वनविभागाच्या विश्रामगृहावर या कार्यक्रमाच्या योजनाची बैठक झाली. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या संकल्प से सिद्धी उपक्रमातील एक आदर्श आयोजन असेल. या ठिकाणावरून आगामी काळात वर्धा जिल्हयाच्या संपूर्ण कायापालटचा संदेश सवार्ना जाईल, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या कार्यक्रमाच्या अभिनव नियोजनाबद्दल त्यांनी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवल, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, संगीता शेंडे, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभूर्णे, सुनील गफाट, भुपेंद्र शहाणे आदिंशी चर्चा केली.सेवाग्राम आश्रमासाठी २६६.५३ कोटीचा आराखडाजिल्ह्यााचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ आॅक्टोबर २०१६ रोजी २६६.५३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यताही दिली होती. आता या आराखड्यातील कामांना सुरुवात होणार आहे.या विकास आराखड्यात सेवाग्राम, वर्धा आणि पवनार विभागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, पवनार येथील दिल्ली गेट आणि परिसराचे वारसा संवर्धन, धाम नदी काठाचा विकास, नूतनीकरण व सुशोभीकरण, नदीच्या दोन्ही बाजूस, पवनार आश्रम ते विनोबा भावे यांच्या समाधीपर्यंत चालण्यासाठी पादचारी रस्त्याची निर्मिती, नदी काठाची स्वच्छता व नूतनीकरण तसेच पर्यटकांसाठी सुविधा, सेवाग्राम परिसरामध्ये अंगुरी बागेजवळ १००० व्यक्तींसाठी सभागृह, यात्री निवासाच्या परिसरातील प्रदर्शन हॉलची दुरुस्ती, गांधी चित्र प्रदर्शनी येथील दुरुस्ती व नूतनीकरण, हेरिटेज पर्यटन विकासासाठी नागरी सुविधा करण्यात येणार आहेत.गांधी फॉर टूमारो - महात्मा गांधी प्रशिक्षण व संसाधन केंद्र हे विकास आराखड्यातील सर्वात जास्त आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान, त्यांचे साधे राहणीमान, स्वच्छतेचा आग्रह, ग्रामीण विकास, तंत्रज्ञान, निसर्गोपचार, कला, संस्कृती याची माहिती पुढील पिढीला अध्ययनाकरिता उपलब्ध करून देण्यासाठी हे केंद्र तयार करण्यात येणार आहे.