शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

सुहास घनोकार। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कृषिपंपांना वीज देण्यासाठी तत्कालीन सरकारने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली. ही ...

ठळक मुद्दे१ हजार ५९३ प्रस्ताव मंजूर : २५७ सौर कृषिपंपच कार्यान्वित

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषिपंपांना वीज देण्यासाठी तत्कालीन सरकारने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली. ही योजना जाहीर झाल्यानंतर महावितरण कंपनीने पारंपरिक पद्धतीने वीजजोडणीसाठी अर्ज घेणे बंद केले. एकप्रकारे ही योजना बळजबरीने लादण्यात आली. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे या योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. कृषिपंपाकरिता शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यातील २ हजार ६१३ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपाकरिता अर्ज केले. यातील १ हजार ५९३ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले. तर पुरेशा कागदपत्रांअभावी ८२० अर्ज बाद ठरलेत. १ हजार ५९३ पैकी ८९१ शेतकऱ्यांनी आवश्यक रकमेचा भरणा केला. यातील ५५८ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्याकरिता कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. याकरिता प्रथम शेतकऱ्याला व्हेंडर सिलेक्शन अर्थात एजन्सीची निवड करावी लागली.जिल्ह्याकरिता रवींद्रा एनर्जी लि., क्लारो एनर्जी प्रा. लि. नोव्हस ग्राीन एनर्जी सिस्टम्स लि., शक्ती पम्पस् इंडिया लि., मुंद्रा सोलर प्रा. लि., स्पॅन पम्पस् प्रा. लि., रोटोमॅग मोटर्स अ‍ॅण्ड कंट्रोल प्रा. लि. टाटा पॉवर सोलर सिस्टम लि. जी. के. एनर्जी मार्केटर्स प्रा. लि., रॉमेट सोल्युशन्स, सीआरआय पम्पस् या कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे.मात्र, टाटा वगळता अनेक कंपन्यांकडून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही सौर कृषिपंप बसविण्यात आले नाहीत.एक-दीड वर्ष लोटूनही मंजूर १ हजार ५९३ पैकी केवळ २५७ शेतकºयांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. ही आकडेवारी निम्मीही नसून याला संबंधित एजन्सी आणि वीज वितरणच्या उदासीन धोरणाचा फटका बसल्याचे लक्षात येते. मंजूर प्रस्ताव प्रक्रियेत असल्याचे वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.जिल्ह्याकरिता शासनाने नेमलेल्या बहुतांश एजन्सीकडे वर्ष लोटल्यानंतर कृषिपंपाकरिता साहित्य आले. ते धूळखात पडून आहे. त्यामुळे अद्याप पंप लागले नाहीत. संबंधित शेतकरी महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकला आहे.गुंडाळली जाणार काय?शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी आणि पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाकरिता लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, एजन्सी आणि महावितरणमध्ये असलेल्या असमन्वयामुळे योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडालेला दिसून येतो. त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला महाविकास आघाडी सरकारकडून नवसंजीवनी मिळणार की योजना गुंडाळली जाणार याविषयी चर्चेला पेव फुटले आहे.योजनेतील प्रवर्गनिहाय रकमेचे प्रारूपया योजनेत अल्प रकमेत रकमेत कनेक्शन देण्यात येते. तीन अश्वशक्तीच्या पंपासाठी खुल्या प्रवर्गाकरिता १६ हजार ५६०, तर अनुसूचित जाती घटकासाठी ८ हजार २८० रुपये, पाच अश्वशक्तीच्या पंपाकरिता २४ हजार ७१० आणि १२ हजार ३५५ रुपये आकारण्यात येतात. ही रक्कम एकदाच भरल्यानंतर दरमहा वीज बिलाची कटकट राहात नाही. तसेच मोटारचा अतिरिक्त खर्च करावा लागत नाही.

टॅग्स :water transportजलवाहतूक