शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनरचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:13 IST

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिष्टमंडळाचे जुन्या पेंशनच्या संदर्भातील निवेदन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारून १६ आक्टोबरला वित्त विभागासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देवित्त विभागासोबत बैठक : सर्वांचे लक्ष चर्चेतील निर्णयाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिष्टमंडळाचे जुन्या पेंशनच्या संदर्भातील निवेदन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारून १६ आक्टोबरला वित्त विभागासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले असून आता या पेन्शनचे भवितव्य सदर बैठकीतील चर्चेअंती ठरणार असल्याने सर्वांच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.जुन्या पेंशनच्या मागणीसाठी व राज्यातील मृतक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना केंद्र व इतर राज्याच्या धर्तीवर जुनी कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासाठी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ ला आणि नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात राज्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने शिवनेरी ते मंत्रालय अशी पेंशन दिंडीचे नियोजन केले होते; पण ऐनवेळी पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व विक्रम काळे, बाळाराम पाटील, नागो गाणार, दत्रातय सावंत, श्रीकांत देशपांडे, कपील पाटील यांनी केले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आंदोलन मंडपाला शशिकांत शिंदे, नारायण पाटील, सिद्धराम म्हेत्रे, मनीषा कायंदे या आमदारसह सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन आपणही कर्मचाऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगत त्यांची बाजून जाणून घेतली.मुंबई येथे पार पडलेल्या सदर आंदोलनात संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे, उपाध्यक्ष हेमंत पारधी, सचिव प्रमोद खोडे, कार्यध्यक्ष कृष्णा तिमासे, मनोज पालिवाल, आशीष बोटरे, सतीश धारपुरे, अमर गोरे, सुरज वैद्य, सचिन शंभरकर, नाना निमकर, पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त पेंशनर सहभागी झाले होते. १६ रोजी होणाऱ्या बैठकीकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.१६ आक्टोबरला सरकारने दिलेले चर्चेचे निमंत्रण हे आंदोलनाचे यशच आहे. या बैठकीतून जर संघटन आणि कर्मचारी हित जोपासणारा निर्णय न झाल्यास पुढे आंदोलनाचे स्वरूप तीव्र करू. आणि त्याची सर्वस्वी जाबदारी राज्य सरकारची राहील.- सुशील गायकवाड, राज्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन.