शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

छत्रपती संभाजी राजे प्रतिभावंत लेखक

By admin | Updated: May 18, 2016 02:20 IST

छत्रपती संभाजीराजांचे हिंदी, मराठी आणि संस्कृतवर प्रभुत्व होते. बालपणी आईसाहेब जिजाऊंनीच संभाजीराजांना संस्कृतचे शिक्षण दिले होते.

सुधीर पांगूळ : शंभूराजे जयंती कार्यक्रमवर्धा : छत्रपती संभाजीराजांचे हिंदी, मराठी आणि संस्कृतवर प्रभुत्व होते. बालपणी आईसाहेब जिजाऊंनीच संभाजीराजांना संस्कृतचे शिक्षण दिले होते. म्हणूनच संभाजीराजांनी वयाच्या १४व्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण ग्रंथ लिहिला, असे मत शंभूराजे सोशल आॅर्गनायझेशन, युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगूळ यांनी व्यक्त केले.शंभूराजे सोशल आॅर्गनायझेशन, युवा सोशल फोरमच्यावतीने सिव्हील लाईन स्थित शहीद स्मारक येथे छत्रपती संभाजीराजांची जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा सेवा संघाचे सचिव सुधीर गिऱ्हे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, कार्याध्यक्ष तुषार उमाळे, पराग भोयर, मिलिंद मोहोड, प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.पांगूळ पूढे म्हणाले की, कावेबाज, धूर्त, कपटी, स्वराज्यद्रोही, रक्तपिपासू, धर्ममार्तंड, मनुवादी गुप्त शत्रूंना पराभूत करण्यासाठी संभाजी राजांनी हातात लेखणी घेतली आणि ग्रंथलेखन केले. त्यामुळेच ते बहुजनांच्या साहित्यिक स्वातंत्र्यचेही जनक आहेत. त्यांनी नृपशंभू, शंभूराज, संभुकवी, संभराज, संभा, संभूज आदी नावांनी साहित्यिक रचना केल्याचे सांगितले. गिऱ्हे यांनी संभाजीराजे स्वत: विद्वान, अभ्यासू, जिज्ञासू, पराक्रमी, चरित्र्य संपन्न, प्रजावत्सल, न्यायी आणि स्वाभिमानी होते. हजारो वर्षांपासून सुरू असलेला, सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यासाठी राजांनी बंड केले. भूमिपुत्रांना साहित्यिक, न्यायिक, सांस्कृतिक, प्रशासकीय स्वातंत्र्य देण्यासाठी वैदिकांविरूद्ध संघर्ष केला. यामुळे तेच खरे स्वातंत्र्यवादी आहे. स्त्री-स्वातंत्र्यचेही ते पुरस्कर्ते होते, असे सांगितले. विधळे, उमाळे यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी मशाल प्रज्वलित करून छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशांत रोकडे, मयूर डफळे, निखिल झुंजूरकर, विवेक तळवेकर, विवेक डेहणकर, सतीश लांबट, प्रसन्ना इंगोले, श्याम बोटकुले, बशीर शेख, वैभव तळवेकर, अतुल शेंद्रे, रूपेश वाघमारे, समीर खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)