शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेच्या एमगिरीतील केमिकल युनिटला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:59 IST

रामनगर भागातील एमगिरी परिसरातील केमिकल युनिटला गुरूवारी दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात विविध साहित्य जळून कोळसा झाले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसली तरी यात सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्दे३४ लाखांचे नुकसान : विविध साहित्यांचा झाला कोळसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील रामनगर भागातील एमगिरी परिसरातील केमिकल युनिटला गुरूवारी दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात विविध साहित्य जळून कोळसा झाले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसली तरी यात सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.गुरूवारी दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास एमगिरी भागातील केमिकल युनिटमधून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने घटनेची माहिती एमगिरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत न.प.च्या अग्निशमन विभागाला दिली. सुरूवातीला एमगिरीतील कर्मचाऱ्यांनी आग प्रतिबंधक सिलिंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा करीत अध्या तासाच्या कालावधील आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत केमिकल युनिटमधील फर्निचर, विविध प्रकारचे रसायन आणि इतर साहित्य जळाल्याने सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे एमगिरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे एमगिरी प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :fireआग