शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शुभांगी उईके मृत्यूच्या तपासाकरिता खासदार, आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:37 IST

जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शुभांगी उईके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शुभांगी उईके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. असे असताना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणात कुठलीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी खा. रामदास तडस आणि आ. डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांना एका निवेदनातून केली. शिवाय या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचीही मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.शुभांगी उईके मृत्यू प्रकरणात पहिले आदिवासी संघटना आणि आता वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडे घातले. या संघटनांनी केलेल्या मागणीवरून पोलिसांनी प्रारंभी आत्महत्या दर्शविलेल्या या प्रकरणात आता हत्येच्या दिशेने तपास करण्याचे आश्वासन दिले. असे असले तरी सध्या या दिशेने कुठलेही पाऊल उचलल्याचे दिसत नाही. यामुळे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली व आर्थिक मदत मिळवून दिली आहे.कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाखांचा धनादेशशुभांगी उईके या आदिवासी युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निवेदन आ. डॉ. पंकज यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना दिले होते. सदर कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तत्सम पत्र आ. डॉ. पंकज भोयर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या पत्रानुसार मुख्यमंत्र्यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश दिला असून तो उद्या बुधवारी शुभांगीच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री