स्वस्त धान्य दुकाने होणार किराणा विक्री दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 05:00 AM2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:30+5:30

शासनाने रास्त भाव दुकानातून काय विक्री करावे, याबाबत ९ मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. गव्हाच्या चार जाती, तांदळाच्या ११ जाती, खाद्यतेल, पामतेल, रवा, मैदा, गूळ, शेेंंगदाणे, भाजीपाला विक्री करता येईल. कृषी विभागाची परवानगी घेऊन प्रमाणित बी-बियाणेही विक्री करता येणार आहे. नोगा उत्पादने, खादी ग्रामोद्योग संघाची उत्पादनेही विक्रीस परवानगी असणार आहे.

Cheap grain shops will be grocery sales shops | स्वस्त धान्य दुकाने होणार किराणा विक्री दुकाने

स्वस्त धान्य दुकाने होणार किराणा विक्री दुकाने

Next
ठळक मुद्देशासन निर्णय : दूध, मैदा, बेसण, भाजीपाल्यासह मिळेल शालेय साहित्य

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वस्त धान्य दुकानात यापुढे गहू, तांदळासोबतच दूध, तेल रवा, मैदा, बेसण, भाजीपाला आणि शालेय साहित्य उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाने गहू व तांदूळ याशिवाय वरील वस्तू विक्री करण्याची मुभा स्वस्त धान्य दुकानदारांना दिली आहे. मात्र, संबंधित माल दुकानदारांनी स्वत: उपलब्ध करून घ्यायचा आहे. याबाबत शासनाकडून मध्यस्थी राहणार नसल्याचेही शासन निर्णयात नमूद आहे. यामुळे आतापर्यंत शासनमान्य स्वस्त धान्य दुकान, अशी ओळख असलेल्या दुकानांची ओळख किराणा मालाचे दुकान अशी होणार आहे.
शासनाने रास्त भाव दुकानातून काय विक्री करावे, याबाबत ९ मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. गव्हाच्या चार जाती, तांदळाच्या ११ जाती, खाद्यतेल, पामतेल, रवा, मैदा, गूळ, शेेंंगदाणे, भाजीपाला विक्री करता येईल. कृषी विभागाची परवानगी घेऊन प्रमाणित बी-बियाणेही विक्री करता येणार आहे. नोगा उत्पादने, खादी ग्रामोद्योग संघाची उत्पादनेही विक्रीस परवानगी असणार आहे. नागरिकांना ग्राहकोपयोगी वस्तूंचे वाटप होण्यासाठी दुकाने सकाळी ४ तास व सायंकाळी ४ तास उघडी ठेवण्यात यावीत, ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणी दिवसभर दुकाने उघडी ठेवावीत, असेही आदेशात म्हटले आहे. कारखाने, उद्योग असलेल्या ठिकाणीही दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवावी लागणार आहेत.
स्थानिक परिस्थितीनुसार दुकानाच्या वेळेचा अपर जिल्हाधिकारी, शिधापत्रिका नियंत्रक यांनी निर्णय घ्यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ज्यांच्याकडे जागा आहे आणि काही करायची इच्छा आहे, त्यांना किराणा साहित्य, दूध, भाजीपाला एवढेच नव्हे तर खादी ग्रामोद्योग संघाच्या उत्पादनांचीही विक्री करता येणार आहे. या व्यवसायातून स्वस्त धान्य दुकानदारांना उत्पन्न मिळून त्यांचे जीवनमान उंचवावे या उद्देशातून शासनाने हा निर्णय घेतला आहे.
-रमेश भेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

Web Title: Cheap grain shops will be grocery sales shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार