शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

सेवाग्राम आश्रमात दिवसभर फिरला चरखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

आश्रम परिसरालगतच्या नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून सकाळी रामधून गात प्रभातफेरी काढण्यात आली. आश्रमातील स्मारकांना वळसा घालून बापू कुटी प्रांगणात सर्वधर्म प्रार्थना झाली. त्यानंतर सकाळी ६ वाजतापासून अखंड सूत्रयज्ञाला सुरुवात झाली. आश्रमातील ज्येष्ठ कुसूम पांडे, नथ्थुजी चव्हाण, डॉ. शिवचरण ठाकूर, प्रशांत ताकसांडे व पवन गणवार यांनी सूतकताईला प्रारंभ केला.

ठळक मुद्देसूत्रयज्ञातून बापूंना आदरांजली : ४६ हजार मीटर सूतकताई

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रपिता यांच्या ७२ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून अखंड सूतकताई करुन बापूंना आदरांजली वाहिण्यात आली. आश्रमात दिवसभर चालेल्या चरख्यावर ४० जणांनी ४६ हजार मीटर सूतकताई करण्यात आली.आश्रम परिसरालगतच्या नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून सकाळी रामधून गात प्रभातफेरी काढण्यात आली. आश्रमातील स्मारकांना वळसा घालून बापू कुटी प्रांगणात सर्वधर्म प्रार्थना झाली. त्यानंतर सकाळी ६ वाजतापासून अखंड सूत्रयज्ञाला सुरुवात झाली. आश्रमातील ज्येष्ठ कुसूम पांडे, नथ्थुजी चव्हाण, डॉ. शिवचरण ठाकूर, प्रशांत ताकसांडे व पवन गणवार यांनी सूतकताईला प्रारंभ केला. नयी तालिम समिती अंतर्गत येणाऱ्या आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टकळी, पेटीचरख्यावर आश्रम परिसरात सूतकताई केली. त्यानंतर दिवसभरात आश्रमाला भेट देणाºया अनेकांनी सूतकताई करुन बापूंना आदरांजली वाहिली. यात गांधी सेवा संघाचे अध्यक्ष आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी मंत्री कनकमल गांधी यांचाही समावेश होता. सायंकाळी साडेपाच वाजता प्रार्थना भूमीवर सामूहिक सूत्रयज्ञ झाले. सायंकाळी दैनंदिन प्रार्थना झाल्यावर बापू कुटीच्या वºहांड्यात सर्व धर्माची भजने झालीत. आश्रमातील सर्व कार्यक्रमामध्ये आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, मुकुंद मस्के, जालंधरनाथ, सिध्देश्वर उंबरकर, नामदेव ढोले, बाबाराव खैरकार, आकाश लोखंडे, पंडीत चन्नोळे, महादेव लोखंडे, हणुमान पिसुड्डे, रामसिंग बघेल, रवींद्र भुते, शोभा कवाडकर, सुचित्रा झाडे, संगिता चव्हाण, रूपाली उगले, अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर, जयश्री पाटील, माधुरी चांभारे, संगिता बारई, सिंहगड पब्लिक स्कूल, बसमत येथील विद्यार्थी व शिक्षक, ईस्लाम हुसैन, संजय आत्राम, शंकर वाणी, जानराव खैरकर, सुनील फोकमारे, सदा मून आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी