शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

चंदन तस्कर पसार; दुचाकीसह साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:12 IST

गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाग्राम भागातील तलाव परिसरात सुमारे तीन जण संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले;

ऑनलाईन लोकमतवर्धा : गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाग्राम भागातील तलाव परिसरात सुमारे तीन जण संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले; पण पोलीस येत असल्याची चुणूक लागताच चंदन तस्कर असलेल्या तीनही व्यक्तींनी घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून चंदनाचे लाकूड, दोन दुचाकी, कुºहाड तसेच कटर जप्त केले आहे.काही दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बजाजवाडी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या निवासस्थानावरून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची मोठी झाडे तोडून नेली होती. दोन्ही घटनांची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. तेव्हापासून चंदन चोर व चंदनाची तस्करी करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान, तीन अज्ञात व्यक्ती सेवाग्राम भागातील तलाव परिसरात संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. दरम्यान, संधी साधून तीनही संशयितांनी दुचाकी व इतर साहित्य तेथेच सोडून पोबारा केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता त्यांना चंदनाचे लाकूड व दुचाकी तसेच लाकूड कापण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. या घटनेची शहर पोलिसांनी नोंद घेतली असून पसार झालेल्या चंदन तस्करांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सदर प्रकरणी शोन अंबादास बेलूकर रा. शारदानगर यांच्या तक्रारीवरून शहर ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा