शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत १.०१ कोटी खर्चाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:36 IST

शासन दरबारी प्रतिनिधीत्व करणारे जिल्ह्यात चार आमदार आहेत. यापैकी दोन काँग्रेस तर दोन भाजपाचे आहे. त्यांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८ कोटी ९२ लाखांचा विकास निधी मंजूर झाला होता.

ठळक मुद्देआमदार निधी : ७ कोटी ९० लाखांची विकास कामे

महेश सायखेडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : शासन दरबारी प्रतिनिधीत्व करणारे जिल्ह्यात चार आमदार आहेत. यापैकी दोन काँग्रेस तर दोन भाजपाचे आहे. त्यांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८ कोटी ९२ लाखांचा विकास निधी मंजूर झाला होता. यातील ७.९० कोटी रुपये त्यांनी आजपर्यंत खर्च केले. उर्वरित १.०१ कोटींचा निधी तीन दिवसांत खर्च करण्याचे आव्हान आमदारांसमोर आहे. अन्यथा तो निधी परत जाणार आहे. यावर्षी ७.६२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली, हे विशेष!राज्य शासनाकडून प्रत्येक आमदाराला वर्षाचा दोन कोटींचा विकास निधी दिला जातो. हा निधी त्यांनी गरजेनुसार रस्ते, गटारी, पूर संरक्षण भिंत, स्मशानभूमी आदी विकास कामांसाठी खर्च करणे क्रमप्राप्त असते. या निधीच्या दीडपट विकास कामे करण्याचा अधिकारही आमदारांना शासनाने दिले आहेत. काही आमदार दोन कोटींचा निधीही खर्च करतात; पण काही आमदारांना वर्षभरात हा निधी खर्च करता येत नाही. यामुळे जादाचा निधी खर्चाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मागील वर्षीच्या काही अखर्चित निधीसह यंदा एकूण ८.९२ कोटींचा निधी चारही आमदारांकडे होता. यात वर्धा विधानसभेचे आ.डॉ. पंकज भोयर यांना २.२६ कोटी, आर्वी विधानसभेचे आ. अमर काळे यांना २.३४ कोटी, देवळी विधानसभेचे आ. रणजीत कांबळे यांना २.९ कोटी तर हिंगणघाट विधानसभेचे आ. समीर कुणावार यांना २.२२ कोटी विविध विकास कामे सुचवून खर्च करणे क्रमप्राप्त होते. यापैकी आ.डॉ. भोयर यांनी २ कोटी २५ लाख ९२ हजार रुपये, आ. काळे यांनी २ कोटी १२ लाख ९० हजार रुपये, आ. कांबळे यांनी १ कोटी २९ लाख ३० हजार रुपये तर आ. कुणावार यांनी २ कोटी २२ लाख रुपये खर्च केलेत. उर्वरित निधी येत्या तीन दिवसांत खर्च न केल्यास तो शासनाकडे परत जाणार आहे.समीर कुणावार अव्वलयंदाच्या वर्षी मार्च अखेरपूर्वीच विविध विकास कामे सूचवून १०० टक्के आमदार विकास निधी आ. समीर कुणावार यांनी खर्च केला आहे. त्यांनी सूचविलेल्या २ कोटी १३ लाख २४ हजार रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यांनी आतापर्यंत २ कोटी २२ लाख रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी खर्च केला आहे. आ. भोयर यांनी ८ हजार रुपयांचा निधी, आ. काळे यांनी २१ लाख ११ हजारांचा निधी तर आ. रणजीत कांबळे यांच्यापूढे ८० लाख ६९ हजारांचा निधी येत्या तीन दिवसांत खर्च करण्याचे आव्हान आहे.मागील वर्षी अमर काळे होते आघाडीवरमागील वर्षी वर्धा विधानसभेचे आ.डॉ. भोयर यांना प्राप्त २ कोटींपैकी त्यांनी ८५.७५ टक्के निधी, आर्वीचे आ. अमर काळे यांनी १०० टक्के निधी, देवळी विधानसभेचे आ. रणजीत कांबळे यांनी ९४.७४ टक्के तर हिंगणघाट विधानसभेचे आ. समीर कुणावार यांनी ८७.११ टक्के निधी खर्च केला होता. त्यावेळी अखर्चित निधी शासनाकडे जमा करण्यात आला होता.७.६२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यतायावर्षी आमदार विकास निधीतून जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी एकूण ७ कोटी ६२ लाख १२ हजार रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यात आ.डॉ. पंकज भोयर यांनी सूचविलेल्या २ कोटी १३ लाख ३४ हजार रुपये, आ. अमर काळे यांनी सूचविलेल्या २ कोटी १८ लाख ६४ हजार रुपये, आ. रणजीत कांबळे यांनी सुचविलेल्या १ कोटी १६ लाख ९० हजार रुपये तर आ. समीर कुणावार यांनी सूचविलेल्या २ कोटी १३ लाख २४ हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे.अखर्चित निधीत कांबळेंचा वाटादेवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे आ. रणजीत कांबळे यांचा सर्वाधिक ८० लाख ६९ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सूचविलेल्या काही कामांना प्रशासकीय मान्यताच मिळाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.