शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्यांचा दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:17 IST

दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर दारूविक्रेत्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरात डांगरी वॉर्डात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देगंभीर जखमी : डांगरी वॉर्डातील थरार; हल्लेखोर अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर दारूविक्रेत्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरात डांगरी वॉर्डात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.पूजा प्रवीण काळे (३०) असे दारूबंदी महिला मंडळाच्या जखमी अध्यक्ष महिलेचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, पूजा प्रवीण काळे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. दारूबंदी महिला मंडळाची बैठक घेऊन त्या आपल्या डांगरी वॉर्डातील निवासस्थानाकडे येत होत्या. दरम्यान, घराजवळ चार दारूविक्रेत्यांनी त्यांना अडविले व मारहाण सुरू केली. यातील एका दारूविक्रेत्याने पूजा काळे यांच्या छातीवर चाकूने वार केले. यावेळी आपला नातू का रडत आहे व कशाची गर्दी जमली आहे, हे पाहण्यासाठी पूजाचे वडील रमेश लहानूजी जुमडे हे गेले असता मुलीला चाकूने मारत असल्याचे दिसून आले. दारूविक्रेत्यांचा प्रतिकार करीत मुलीची सुटका केली आणि थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पूजा काळे यांना उपचारासाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्याने तिला पुढील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेगाने तपासकार्य करून गणेश भांगे (३२), गोलू पांडे (३४), संदीप थुटरकर ३८ सर्व रा. डांगरी वॉर्ड, हिंगणघाट यांना मंगळवारी अटक केली. घेतले.तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी दिले पाठबळमागील कित्येक वर्षांपासून पूजा काळे या हिंगणघाट शहरात दारूबंदीसाठी काम करीत आहेत. अनेक महिलांना एकत्रित करून त्यांनी दारूबंदी महिला मंडळाची डांगरी वॉर्डात स्थापना केली. पूजा यांच्यासह सहकारी सदस्य महिलांनी डांगरी वॉर्डातून दारू हद्दपार केली. तत्कालीन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी यांनीदेखील दारूबंदी महिला मंडळाला मोठे पाठबळ दिले होते.यापूर्वीही काळेंवर अनेकवेळा हल्लामध्यंतरी हिंगणघाट शहरात अनेक ठिकाणी दारू सुरू होती; मात्र केवळ डांगरी वॉर्डातच दारूविक्री बंद असल्याने चिडलेल्या दारूविक्रेत्यांनी दारूबंदी महिला मंडळाविरोधात पोलिसांत खोट्या तक्रारी करणे सुरू केले. यातही कुणी जुमानत नसल्याचे निदर्शनास आल्याने काळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यापूर्वीही पूजा काळे यांच्यावर जीवघेणा हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.पोलीस अधीक्षकांपुढे आव्हानहिंगणघाट शहरात दारूव्यवसाय प्रचंड फोफावला आहे. स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळेच दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले असून हल्ले करण्यापर्यंत मजल गेली आहे. हा प्रकार पोलिस अधीक्षकांपुढे आव्हान निर्माण करणारा आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी