शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय आरोग्य पथकाने घेतली विदर्भातील तीन जिल्ह्यांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 05:47 IST

यवतमाळ, अमरावती, अकोल्यात कोरोना का वाढला?

अमरावती : देशात कोरोना संक्रमितांची संख्या घटत असताना अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांत पॉझिटिव्ह रुग्ण वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आराेग्य विभागाच्या पथकाने रविवारी आरोग्य यंत्रणांची झाडाझडती घेतली. याच तीन जिल्ह्यांतच कोरोना का वाढला, असा सवाल चमूने उपस्थित केला. कोरोना उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका पथकाने ठेवल्याची माहिती आहे. दिल्ली येथील आरोग्य विभागाचे सुजित कुमार सिंग, संकेत कुलकर्णी व रणजित कौशिक या त्रिसदस्यीय चमूने अमरावती येथील सुपर स्पेशालिटी कोविड-१९ रुग्णालयात पाहणी करून आढावा घेतला. यावेळी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रमणले, अकोला जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, यवतमाळचे जिल्हा आरोग्य अधिकारी हरी पवार, रेवती साबळे, रविभूषण आदी उपस्थित होते. चमूने जिल्हानिहाय कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. अमरावती जिल्ह्यातील संक्रमित रुग्णांच्या मृत्युदराबाबत चिंतासुद्धा व्यक्त केली. कोराेना संसर्ग राेखण्यासाठी उपाययोजनांवर बोट ठेवले. आता कठोर उपाययोजना करा, चाचण्यांची संख्या वाढवा, आयसोलेटेड रुग्णांवर करडी नजर ठेवा, गृहविलगीकरणातील संक्रमित रुग्णांवर पाळत ठेवा, असा कानमंत्र स्थानिक आरोग्य यंत्रणांना दिल्याची माहिती आहे. कोरोनाच्या आनुषंगाने अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्हा आरोग्य यंत्रणांचा केंद्रीय पथकाने आढावा घेतला. आतापर्यंत केलेल्या उपाययोजना आणि रुग्णसंख्येबाबतची माहिती चमूने घेतली. - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती