शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सिंदी (रेल्वे)चा तान्हा पोळा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:49 IST

विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्णाची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) चा साजरा होणारा बाल गोपालांचा लाकडी नंदी पोळा लौकिक मिळवून आहे. ऐतिहासिक परंपरा असलेला तान्हा पोळा १४० वर्षाच्यावर जात आहे.

ठळक मुद्देआजही जत्रेचे स्वरूप : बाजार चौकात बसविला नंदीचा पुतळा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्णाची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) चा साजरा होणारा बाल गोपालांचा लाकडी नंदी पोळा लौकिक मिळवून आहे. ऐतिहासिक परंपरा असलेला तान्हा पोळा १४० वर्षाच्यावर जात आहे. पिढया न पिढ्या हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जात आहे. सिंदी शहराला ‘पोळा सिटी’ अशी नवी ओळख निर्माण होत आहे. याची प्रचिती म्हणून बाजारचौकात नंदीचा पुतळा यावर्षी बसविण्यात आला आहे.नगर पालिकेच्यावतीने आयोजित या पोळ्यात पोलीस प्रशासन, महावितरण कर्मचाऱ्यांकडून चोख व्यवस्था ठेवली जाते. हा ऐतिहासिक पोळा पाहण्यासाठी सिंदीवासीय सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देतात. या दिवशी गावात प्रत्येक घरी पाहुणा हा सोहळा पाहण्यासाठी हजर असतो.सिंदी शहराला येते जत्रेचे स्वरूपपोळा सणाची एक महिन्यांपासून आतुरतेने सिंदीवासी वाट पाहतात. तान्हा पोळ्यासाठी ४ ते ५ दिवसांपासून सिंदी गाव सजविण्यात येते. सायंकाळी ४० ते ५० हजार लोकांच्या उपस्थितीत पोळा सण साजरा केला जातो. एक नंदीवाला व झाँकीवाल्याचा खर्च १ ते २ लाखांपर्यंत असतो. ढोलताशांच्या निनादात ट्रॅक्टर ट्रॉलीवर विद्युत रोषणाई करून नंदी बैल ऐटीत बाजार चौकात येतात.सुरक्षेकरिता पोलिसांसह गृहरक्षकही तैनातसिंदी तान्हा पोळ्याच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या नेतृत्वात ३ पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक, १२५ पोलीस शिपाई, एलसीबीची टीम, गृहरक्षक, कॅमेराद्वारे शुटींग करण्यात येणार आहे. अनुचित घटना टाळण्याकरिता या प्रकारचा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी दिली. हा पोळा पाहण्यासाठी विदर्भ व मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येने नागरिक येतात. रात्री उशीरापर्यंत हा सोहळा चालतो.