शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

सीसीटीव्हीचे डोळे मिटले

By admin | Updated: January 3, 2015 01:56 IST

शहरातील रस्त्यावर होत असलेल्या चैन स्रॅचिंगसह विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने बजाज चौक व आर्वी नाका परिसरात

रूपेश खैरी  वर्धा शहरातील रस्त्यावर होत असलेल्या चैन स्रॅचिंगसह विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने बजाज चौक व आर्वी नाका परिसरात जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्यावतीने संयुक्तरित्या निर्णय घेत दोन चौकात आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्या पैकी केवळ तीन कॅमेरे सुरू असून उर्वरीत पाच कॅमेऱ्याचे डोळे मिटले आहेत. या कारणाने त्याचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे दिसते. या कॅमेऱ्याकरिता जिल्हा नियोजन समितीत प्रस्ताव सादर करण्यात आला होता; मात्र तिथून मंजुरी मिळाली नसल्याने स्पॉन्सरशिप मधून कॅमेरे खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. मध्यतंरी शहरात दुचाकीने येत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरांनी चांगलाच हैदोस घातला होता. या चोरट्यांना पकडणे जिल्हा पोलिसांकरिता आव्हान ठरले होते. चोरटे चोरी करताना कोणताही सुगावा सोडत नसल्याने त्यांना पकडणे कठीण जात होते. हे चोरटे कोणत्या मार्गाने येतात व कोणत्या मार्गाने जातात याचा कुठलाही सुगावा पोलिसांना नव्हता. या चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांच्यावतीने सुरू होते; मात्र त्यांना अपयश येत होते. या चोरट्यांचा सुगावा लागावा व शहरात घडत असलेल्या इतर गोष्टींवरही पोलिसांची नजर राहावी, याकरिता मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाने वरिष्ठांकडे सोपविला. यात शहरातील मुख्य चौक म्हणून बजाज चौक व आर्वी नाका चौकात हे कॅमेरे सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. ही संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी मांडली. या करिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने तत्कालीन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्याशी संपर्क साधत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तिथून मंजुरी मिळाली नसल्याने स्पॉन्सरशिप मधून कॅमेरे खरेदी करून ते लावण्यात आले.आता तीन कॅमेरे बंद असल्याने ते निरुपयोगी ठरत आहेत. शहरातील दोन मुख्य चौकापैकी बजाज चौकात चार व आर्वी नाका परिसरात चार असे आठ कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यात चोरटे कैद होतील असे पोलिसांना वाटत होते. चोरटे कैद होण्याकरिता निदान हे कॅमेरे सुरू राहणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत आर्वी नाका परिसरातील दोन व बजाज चौक परिसरातील एक कॅमेरा सुरू आहे. या कॅमेरे चित्र जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या कंट्रोल रूमध्ये जोडलेल आहेत. यात आज चार कॅमेऱ्याचे चित्र दिसत असून बजाज चौकातील एक कॅमेरा दोन ठिकाणचे चित्र दाखवित आहे. बंद असलेले हे कॅमेरे केवळ चौकात असलेल्या वाहतूक नियंत्रक दिव्यांचे खांब राखत असल्याचे चित्र आहे.