शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

केबलच्या कामांमुळे नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:56 IST

शहरात भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नालीचे खोदकाम करीत असताना पाईपलाईनकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर सर्वत्र माती : पाईपलाईन फुटल्याने तयार होतोय चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात भूमिगत केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नालीचे खोदकाम करीत असताना पाईपलाईनकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पाईप फुटून पाणी पुरवठा प्रभावित होणे तथा रस्त्यावर पाणी साचून चिखल होण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असून त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा प्रकार सध्या शहरात सर्वत्र पाहावयास मिळत आहे.शहरातील मुख्य मार्ग ते बॅचलर रोडकडे जाणाºया रस्त्यांवर केबल टाकण्याचे काम केले जात आहे. यातील बडे चौक ते अष्टभूजा चौक मार्गावर केबल टाकण्यासाठी नालीचे खोदकाम करण्यात आले. यात केबल टाकून नाली बुजविण्यात आली; पण ती व्यवस्थित बुजविलेली नाही. परिणामी, या मार्गावर सर्वत्र माती विखूरलेली आहे. केबल टाकण्यासाठी नाली खोदत असताना पाईपलाईनही फुटली. यामुळे सदर रस्त्यावर पाणी वाहताना दिसून येते. सकाळ-सायंकाळ रस्त्यावर पाणी राहत असल्याने ये-जा करणाºया वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. शिवाय तेथील रहिवाश्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील एक आठवड्यापासून सदर मार्गावर हे काम सुरू आहे. शिवाय पूढे पाषाण चौकापर्यंत मागील एक आठवड्यापासून केवळ खोदकाम करून ठेवण्यात आलेले आहे. पाषाण चौकातील सिमेंट रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. यामुळे बडे चौक ते पाषाण चौकापर्यंतच्या रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता मुख्य मार्गाला जोडणारा असल्याने तथा रामनगर, प्रतापनगर व त्यापूढील नागरिकांना याच रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. रहदारीच्या रस्त्यावर काम सुरू असल्याने वाहतुकीचाही खोळंबा होत आहे. परिणामी, मुली, महिला व वृद्धांना अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे. दररोज घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराला समज देत कामे लवकर आटोपावीत, नाली व्यवस्थित बुजवून माती काढून टाकावी आणि फुटलेली पाईपलाईन त्वरित दुरूस्त करावी, अशी मागणी हवालदारपूरा व मालगुजारीपूरा येथील नागरिकांनी केली आहे.याबाबत शनिवारी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना देण्यात आल्या आहे. शिवाय महावितरणच्या व्यवस्थापकांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.रस्त्यावर पाणी साचत असल्याने अडचणबडे चौक ते अष्टभूजा चौक हा मार्ग रहदारीचा आहे. रात्री उशिरापर्यंत या मार्गाने वर्दळ असते. यातच सकाळी व सायंकाळी नळ सोडल्यानंतर फुटलेल्या पाईपलाईनमधील पाणी रस्त्यावर वाहताना दिसते. काही ठिकाणी हे पाणी साचून डबके तयार होत आहे. यामुळे नागरिकांची गोची झाली असून पाणीही व्यर्थ वाहून जात आहे. याकडे लक्ष देत ही पाईपलाईन त्वरित दुरूस्त करणे गरजेचे झाले आहे. शिवाय वाहतुकीची कोंडी होत असल्याने छोटे-छोटे अपघात दररोज होत आहेत. परंतु, अनेक प्रकरणे पोलीस कचेरीपर्यंत पोहोचत नाहीत.