शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

शासनाच्या निषेधार्थ कापसाची होळी

By admin | Updated: December 6, 2014 22:52 IST

नवीन केंद्र शासनानेही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला़ जुनेच धोरण राबवून अल्प हमीभाव जाहीर केला़ राष्ट्रीय किसान जागृती अभियानने केंद्र सरकारच्या या कापूस धोरणाचा गावोगावी कापूस

वर्धा : नवीन केंद्र शासनानेही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला़ जुनेच धोरण राबवून अल्प हमीभाव जाहीर केला़ राष्ट्रीय किसान जागृती अभियानने केंद्र सरकारच्या या कापूस धोरणाचा गावोगावी कापूस जाळून निषेध केला़ या आंदोलनात शेतकऱ्यांनीही सहभाग घेत शासनाचा निषेध नोंदविला़ वर्धेत मगनवाडी येथील खरेदी भवनासमोर कापसाची होळी करण्यात आली़ यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले़मागील सरकारच्या काळात देशातील व प्रामुख्याने विदर्भातील कापूस उत्पादकांचे हाल झाले होते़ परिणामी, देशात व प्रामुख्याने विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या़ या शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा समोर करून सत्तेत आलेल्या नवीन सरकारनेही आता जुन्याच सरकारच्या धोरणाचा अवलंब केल्याने पुन्हा एकदा देशातील कापूस उत्पादक संकटात सापडला आहे़ यंदा पाऊस उशिरा आल्याने पेरणीसही विलंब झाला़ यामुळे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन घटले़ अशा स्थितीत कापसाला असलेल्या अल्प भावामुळे एकरी खर्चही भरून निघणे कठिण झाले आहे़ नवीन शासनानेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसल्याची जाणीव सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाली आहे़ नवीन शासन जुन्याच सरकारच्या वाटेवर असल्याने शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी कापूस धोरणाचा विरोध करण्यासाठी कापसाची गावोगावी होळी केली़ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाला जाळलेला कापूस भेट देण्यात येणार आहे़ शिवाय दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांनाही जाळलेला कापूस देणार असल्याची माहिती अभियानाचे प्रवक्ते अभिमन्यू भारतीय यांनी दिली़ निवेदन सादर करताना रवी मानव, सुमंत दास, यशवंत ढगे, डॉ़ राम बोकडे, जगदीश मर्दराज, बाबूलाल कोरी आदी शेतकरी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)