शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर लाल्या व बोंडअळीचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:01 IST

कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप याबाबतची बातमी लोकमतने सोमवारी प्रकाशित करताच सेलू तालुका कृषी विभागाच्या चमूने मंगळवारी शेतकऱ्यांच्या शेताला भेट देवून कपाशीची पाहणी केली.

ठळक मुद्देलोकमत बातमीचा परिणाम: कृषी विभागाने केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप याबाबतची बातमी लोकमतने सोमवारी प्रकाशित करताच सेलू तालुका कृषी विभागाच्या चमूने मंगळवारी शेतकऱ्यांच्या शेताला भेट देवून कपाशीची पाहणी केली.डोरली शिवारात सुरेश केशवराव तेलरांधे व भाष्कर पांडुरंग गोमासे यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने तालुका तांत्रिक कृषी अधिकारी प्रियंका ढेरेंगे, कृषी पर्यवेक्षक किशोर वऱ्हाडे, कृषी सहाय्यक मंगेश ठाकरे यांनी कपाशीची पाहणी केली. तेलरांधे यांचे शेतात कपाशीवर मोठया प्रमाणात बोंडअळीने शिरकाव केल्याचे निष्पन्न झाले.तर गोमासे यांचे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले. बागायती शेती करणारा तालुका म्हणून ओळख असलेल्या भागात शेतकरी केळी पिकापासून फारकत घेत महागडा खर्च करुन कपाशीचे भरघोस उत्पन्न घेत असून आपली आर्थिक घडी सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न करीत असताना यावर्षी पुन्हा गुलाबी बोंड अळी आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.कृषी विभागाने शेतकºयांना कपाशीच्या लागवडी पासुनच बोंडअळी निर्मूलनासाठी प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून सर्तकता बाळगण्यासाठी उपाय योजना सुचविल्या त्याचा शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन त्या उपायावर अंमल केला पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी असेच संकट कपाशीवर आल्यास कोणते पिक घेवून वर्षभºयाची आर्थिक घडी सुरळीत करता येईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. कृषी विभागाने घोराड, झडशी आदी भागात दौरा केला आहे.शेतकऱ्यांनी पिकाला पाणी दिल्यामुळे नवीन फुल व बोंडधारणा झाली आहे. त्यामुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. तर काहीच्या शेतात पाण्याच्या ताणामुळे लाल्याचा प्रादुर्भाव झाला. कपाशीला आता पाणी देवू नये, तसेच जानेवारी महिन्यातच कपाशी उलंगवाडी करावी. बोंडअळीचा प्रादुर्भाव नुकसानग्रस्त पातळीच्या आत आहे.- बाबुराव वाघमारे, तांत्रिक कृषी अधिकारी सेलू

टॅग्स :cottonकापूस