शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतीची दहशत; वर्धा जिल्ह्यातील कुटुंबावर नऊ वर्षांपासून बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 14:22 IST

जात पंचायतीच्या जाचामुळे मागील नऊ वर्षांपासून वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील रमेश धुमाळ यांचा परिवार दहशतीत जीवन जगत आहे.

ठळक मुद्देसमाजाकडून मानसिक छळ कुटूंबियांवर जातबांधवांनी घातला सामुहिक बहिष्कार

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जात पंचायतीच्या जाचामुळे मागील नऊ वर्षांपासून वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील रमेश धुमाळ यांचा परिवार दहशतीत जीवन जगत आहे. समाजातील पंचायतीपुढे अनेकदा विनंत्या करूनही समाजाने त्यांच्यावरील सामूहिक बहिष्कार मागे न घेतल्याने धुमाळ यांची समाजातच मोठी कोंडी करण्यात आली आहे. याविरूध्द आता कायदेशीर लढा लढण्याचा निर्णय धुमाळ यांनी घेतला आहे.२१ फेब्रुवारी २०१० रोजी रमेश धुमाळ यांचे लग्न झाले. यावेळी समाजाचे सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु कालांतराने त्यांच्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील (गोंधळी जोशी) समाजातील पंचमंडळींनी रमेश व त्यांचे सासरकडील मंडळीवर सामाजिक बहिष्कार टाकला. याबाबत रमेश यांनी चौकशी केली व समाजातील लोकांना विचारले तर तुझ्या सासऱ्याला बाट आहे, तुझी सासू समाजाची नाही, त्यामुळे आम्ही त्यांना दंड ठोठावला आहे. आणि तू त्या कुटूंबातील मुलगी केली असल्यामुळे तूही गुन्हेगार आहे. म्हणून तुलाही बहिष्कृत करण्यात येत आहे. तुला दंड भरावा लागेल, असा दम दिला. त्यानंतर समाजाच्या या भूमिकेमुळे हादरलेल्या रमेश यांनी रायपूर (छत्तीगड) येथील जात पंचायतीमध्ये हजेरी लावली. तेथे रमेश व त्यांच्या सासरकडील मंडळींवर प्रत्येक पाच हजार रूपये असा दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला. यावेळी घाबरलेल्या स्थितीत त्यांनी दहा हजार रूपये दंड भरण्याची तयारी दाखविली. परंतु त्यांना दंड भरू न देण्यासाठी परावृत्त करण्यात आले व आता जास्त गावांची मंडळी आलेली नाही. जेव्हा ती येईल, तेव्हा न्याय करू असे सांगण्यात आले. त्या दिवसापासून आजपर्यंत न्यायासाठी याचना करीत असलेल्या रमेश धुमाळ यांना न्यायच मिळालेला नाही. जात पंचायतीच्या अनेक सदस्यांकडे चकरा करून विनंती केली. परंतु ते पंच मानण्यासाठी तयार नाही. या जात पंचायतीत नागपूर येथील तीन, अकोला येथील दोन व बिलासपूर (छत्तीसगड) येथील एका पंचाचा समावेश असल्याची माहिती धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गावोगावी जात पंचायतीत बोलावून अपमानित करण्याचे काम समाजाकडून सुरू असल्याचे रमेश धुमाळ यांनी सांगितले. आपल्याला सन्मानाची वागणूक समाजातच मिळाली पाहिजे. यासाठी आपण आता लढा देण्याचा निश्चय केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रकरणात तक्रार शासनाने दाखल करून घेवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.२०१० पासून आपल्यावर व आपल्या सासरकडील मंडळीवर समाजाने सामूहिक बहिष्कार घातला आहे. दहा हजाराचा दंड ठोठावला. तो भरण्याची तयारीही जात पंचायतीसमोर दाखविली. मात्र तो भरू नये यासाठी ठिकठिकाणी आम्हाला जात पंचायतीसमोर बोलाविले जात आहे व अपमानीत केले जात आहे. समाजाच्या दहशतीमुळे आजवर आम्ही यासंदर्भात तक्रारही केली नाही. मात्र आता असह्य त्रास होत असल्याने कायदेशीर लढा लढण्याचा निश्चय आपण केला आहे. यासाठी इतर समाजाने आम्हाला साथ द्यावी.- रमेश धुमाळ, पिडीत, देवळी, जि. वर्धा

टॅग्स :Governmentसरकार