लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : मुंबई भिवंडी येथून मजुरांना घेऊन इलाहाबादकडे जाणारा एम. एच. ०४ एच. डी. ७३१८ क्रमांकाचा भरधाव मालवाहू तालुक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात उलटला. या अपघातात ३३ मजूर जखमी झाले. जखमींमध्ये तीन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांमध्ये संभ्रम व दहशतीचे वातावरण आहे. परप्रांतीयांच्या घरवापसीसाठी केंद्र सरकारच्यावतीने विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्या तरी हाताला काम नसलेले मजूर मिळेल त्या साधनाने घर गाठण्यासाठी घाई करीत आहेत. असेच काही मजूर भिवंडी येथून कंटेनरने अलाहाबादच्या दिशेने निघाले होते. भरधाव मालवाहू नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात आला असता वाहनचालकाचे वाहनावरिल नियंत्रण सुटले, अशातच वाहन उलटले. यात मालवाहूतील एकूण ३३ जण जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. जखमींपैकी चार व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सदर जखमींवर डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. इंदुरकर, डॉ. खुजे उपचार करीत असून अपघाताची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे.
इलाहाबादकडे जाणारा मालवाहू उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांमध्ये संभ्रम व दहशतीचे वातावरण आहे. परप्रांतीयांच्या घरवापसीसाठी केंद्र सरकारच्यावतीने विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्या तरी हाताला काम नसलेले मजूर मिळेल त्या साधनाने घर गाठण्यासाठी घाई करीत आहेत. असेच काही मजूर भिवंडी येथून कंटेनरने अलाहाबादच्या दिशेने निघाले होते.
इलाहाबादकडे जाणारा मालवाहू उलटला
ठळक मुद्दे३३ मजूर जखमी : नागपूर-अमरावती मार्गावरील ठाणेगाव शिवारातील अपघात