शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

तीन महिन्यांकरिता चालक परवाना होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:04 IST

वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याने अनेक अपघात झाले. उत्तर प्रदेश येथे याच प्रकारातून नुकताच १४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. वर्धेत असा प्रकार घडू नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळीच सतर्कता मोहीम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देकायद्यात तरतूद : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडणार महाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याने अनेक अपघात झाले. उत्तर प्रदेश येथे याच प्रकारातून नुकताच १४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. वर्धेत असा प्रकार घडू नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळीच सतर्कता मोहीम राबविण्यात येत आहे. शिवाय वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास त्या चालकाचा मोटर वाहन कायद्याच्या कलम १२९ (ए) अन्वये तीन महिन्याकरिता वाहन परवाना रद्द करण्याचे प्रावधान आहे. जिल्ह्यात या प्रावधानाचा वापर वाढण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याकरिता सर्वत्र स्कूल बसचा वापर होतो. यात जिल्ह्यात छोट्या खासगी स्कूल बसचा भरणा वाढला आहे. या स्कूल बसमधून आपल्या पाल्यांना पालक शाळेत पाठवित असल्याचे दिसून आले आहे. यात परवाना नसतानाही बरेच आॅटो स्कूल आॅटो म्हणून धावत आहेत. वर्धेत या आॅटो आणि स्कूलबसमध्ये परवानगीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे वहन होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय वाहतूक कायदा आणि स्कूल बसच्या नियमानुसार सुविधा आहे अथवा नाही याची चौकशी होणे अपेक्षित आहे. या कारणामुळे स्कूल बसचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.वर्धेत बऱ्याच स्कूलबसचे चालक वाहन चालविताना मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व वाहतूक पोलिसांनी संयुक्त रित्या कार्यवाही करून अशा चालकांवर कारवाई करीत मोहीम आखण्याची पालकांची अपेक्षा आहे. सध्या जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात स्कूल बस चालकांना या संदर्भात सूचना देण्याकरिता एखादे शिबिर आयोजित करून त्यांना समज देण्याची मागणी होत आहे. लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याने अनेक अपघात झाले. उत्तर प्रदेश येथे याच प्रकारातून नुकताच १४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. वर्धेत असा प्रकार घडू नये याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळीच सतर्कता मोहीम राबविण्यात येत आहे. शिवाय वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास त्या चालकाचा मोटर वाहन कायद्याच्या कलम १२९ (ए) अन्वये तीन महिन्याकरिता वाहन परवाना रद्द करण्याचे प्रावधान आहे. जिल्ह्यात या प्रावधानाचा वापर वाढण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याकरिता सर्वत्र स्कूल बसचा वापर होतो. यात जिल्ह्यात छोट्या खासगी स्कूल बसचा भरणा वाढला आहे. या स्कूल बसमधून आपल्या पाल्यांना पालक शाळेत पाठवित असल्याचे दिसून आले आहे. यात परवाना नसतानाही बरेच आॅटो स्कूल आॅटो म्हणून धावत आहेत. वर्धेत या आॅटो आणि स्कूलबसमध्ये परवानगीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे वहन होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय वाहतूक कायदा आणि स्कूल बसच्या नियमानुसार सुविधा आहे अथवा नाही याची चौकशी होणे अपेक्षित आहे. या कारणामुळे स्कूल बसचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.वर्धेत बºयाच स्कूलबसचे चालक वाहन चालविताना मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी व वाहतूक पोलिसांनी संयुक्त रित्या कार्यवाही करून अशा चालकांवर कारवाई करीत मोहीम आखण्याची पालकांची अपेक्षा आहे. सध्या जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात स्कूल बस चालकांना या संदर्भात सूचना देण्याकरिता एखादे शिबिर आयोजित करून त्यांना समज देण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात ४६९ स्कूल बस धावतात रस्त्यावरवर्धा जिल्ह्यात आजच्या घडीला एकूण ४६९ स्कूल बस रस्त्याने धावत आहेत. त्यांची नोंदणी उप प्रादेशिक परिवहन विभागात आहेत. स्कूल बस म्हणून आवश्यक असलेल्या सुविधा या वाहनांत असल्याचे चालकांकडून सांगण्यात आले आहे. वास्तविकतेत स्कूल बसचा परवाना घेताना या सुविधा असतात व नंतर त्या वाहनातून बेपत्ता होत असल्याचे दिसून आले आहे. याची चौकशी संबंधीत विभागाने करण्याची गरज आहे.जिल्ह्यात कुठल्याही आॅटोला शाळेत विद्यार्थ्यांना पोहोचविण्याची परवानगी नाही. असे असताना मोठ्या प्रमाणात आॅटोतून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. अशा आॅटोंवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी कार्यवाही करण्याची गरज आहे. अन्यथा यातून एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.वयानुसार ठरते विद्यार्थी संख्यास्कूल बसमध्ये विद्यार्थी बसविताना त्यात वयानुसार संख्या कमी जास्त करण्यात आली आहे. खासगीत धावणाऱ्या स्कूल बस या सहा सिटर आहेत. त्यामुळे या वाहनात १२ वर्षाखालील नऊ मुले आणि यापेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी असतील तर त्यांची संख्या सहा असावी असा नियम आहे. येथे मात्र या दुप्पट विद्यार्थी बसविल्या जात असल्याचे दिसून आले आहे.पालकांनीही सतर्कता बाळगण्याची गरजजिल्ह्यात असलेल्या बऱ्याच शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. यामुळे बऱ्यापैकी स्कूल बस बंद आहेत. पण लवकरच शाळा सुरू होणार आहेत. या काळात खासगी स्कूल बस चालकाकडून नियमानुसार सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे अथवा नाही, याची तपासणी करण्याची गरज आहे. आपला मुलगा जातो त्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी तर नाही ना, याची तपासणी पालकांनी करणे अपेक्षित आहे.