गोहदा शिवारातील शेतकऱ्यांत दहशतबोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गोहदा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरु ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून शनिवारी सकाळी उघड झाली. यात शेतकरी सुमित्रा पाटील यांचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.गोहदा येथील शेतकरी महिला सुमित्रा प्रल्हाद पाटील यांचे शेत गोहदा व सालई (पेवट) शिवाराच्या सीमेवर आहे. त्याच्या गोठ्यात गाय बांधून असताना ही घटना घडली. याची माहिती त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच हिंगणी वनविभागाचे क्षेत्रसहायक कावळे, वनरक्षक माहुरे यांनी पंचनामा केला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सदर हल्ला बिबटाचा असल्याचे स्पष्ट केले. सदर शेतकरी महिलेला वाघाच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानाची भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी गावातील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)
बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By admin | Updated: July 19, 2015 02:16 IST