लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : सततचे ढगाळ वातावरण व पावसामुळे खरीप पिकांवर किडीचे आक्रमण व्हायला लागले असून पवनार परिसरामध्ये कपाशीवर मिलिबग (पिढ्या ढेकून) चे आक्रमण झाले आहे. या किडीमुळे झाडाच्या खोडातील रस शोषला जातो व पूर्ण झाड निस्तेज होते. धुऱ्या बंधाऱ्यावर असणाऱ्या बोरीच्या झाडापासून या किडीचा उगम होतो.त्यामुळे उत्पन्नात मोठा फरक पडू शकतो.गतवर्षी बोंडअळीच्या आक्रमणामुळ उद्ध्वस्त झालेला शेतकरी कपाशीवर सुरूवातीलाच किड बघून हादरू लागला आहे. मिलिबग सोबतच तुडतुडे, मावा, पांढरी माशीचाही प्रकोप दिसायला लागला आहे. सोयाबीनवरही खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असून ही कीड सोयाबीनची पाने पोखरून नंतर पानाच्या देठातून मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करते. खोडाचा आतील भाग पोखरून खाते. सदर किडग्रस्त झाड वाळत असल्यामुळे खंगे पडू लागतात व उत्पादनात लक्षणीय घट होते. यावर्षी पिकांवर किडीचे आक्रमण होऊ नये म्हणून कृषी विभाग दक्ष असला तरी कृषी विभागाकडे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे पिकांचे निरीक्षण गावोगावी जावून करणे व उपाययोजनेबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करणे जिकरीचे ठरत आहे.कृषी विभागाने उन्हाळ्यात खरीपपूर्व अनेक गावात शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना किड व्यवस्थानाबाबद्दल माहिती दिली होती. त्यानंतरही आता एैन पीक भरात असताना किडीचा प्रादुर्भाव झाल्याने हा रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना कृषी विभागाने हाती घ्याव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.बोंडअळीने हादरला होता शेतकरीगत वर्षी खरीप हंगामात कपाशी पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट आली. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकात ट्रॅक्टर चालवून संपूर्ण पीक नष्ट करून टाकले. राकाँच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान पवनार परिसरातील शेतकऱ्यांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बोंडअळीच्या ट्रॅक्टर चालविला होता.या वर्षी किडीचे आक्रमण होणार आहे हे निश्चित. तेव्हा शेतकऱ्यांनी किटकनाशकासोबत निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काची फवारणी करणे गरजेचे आहे. सोबतच कामगंध साफळे, लाईट ट्रॅप, यलो ट्रॅप वापरून किडींवर नियंत्रण ठेवता येते. खोडमाशीसाठी इथिआॅन (५० इसी) ४५ मिली व मिलीबग साठी, क्विनॉलफॉस ५० मिली व २५ ग्रॅम निरमा प्रतीपंप फवारणे गरजेचे आहे.प्रशांत भोयर, कृषी सहाय्यक, पवनार
कपाशीवर मिलीबग तर सोयाबीनवर खोडमाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:11 IST
सततचे ढगाळ वातावरण व पावसामुळे खरीप पिकांवर किडीचे आक्रमण व्हायला लागले असून पवनार परिसरामध्ये कपाशीवर मिलिबग (पिढ्या ढेकून) चे आक्रमण झाले आहे. या किडीमुळे झाडाच्या खोडातील रस शोषला जातो व पूर्ण झाड निस्तेज होते.
कपाशीवर मिलीबग तर सोयाबीनवर खोडमाशी
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : उपाययोजना करण्याची गरज