मुहूर्ताचा दर ३०११ रुपये : पहिल्या दिवशी ६०० क्विंटलची आवक वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डवर सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती श्यामकार्लेकर यांच्यासह उपसभापती पांडुरंग देशमुख यांची उपस्थिती होती. सोयाबीनची पहिली बंडी आणणारा शेतकरी सचिन पोळ रा. महाकाळ यांचा समितीच्यावतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सोयाबीनला ३ हजार ११ रुपये दर देण्यात आला. मुहूर्ताच्या दिवशी एकूण ६०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. हा दर कायम राहणार असल्याचे सभापती म्हणाले.त्याप्रसंगी समितीचे संचालक प्रकाश पाटील, विजय बंडेवार, दत्ता महाजन तसेच व्यापारी कैलास काकडे, भंवरलाल चांडक, मनोज दाते, झाडे यांच्यासह समितीचे सचिव समीर पेंडके, सहायक सचिव माधव बोकाडे व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
वर्धा बाजार समितीत सोयाबीन खरेदी
By admin | Updated: October 9, 2016 00:33 IST