शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारातील आरोपींकडून घरफोडीची कबुली

By admin | Updated: October 11, 2014 23:12 IST

शहरातील गांधीनगर येथे एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. त्यांना पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच त्यांनी शहरात दोन

वर्धा : शहरातील गांधीनगर येथे एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. त्यांना पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच त्यांनी शहरात दोन ठिकाणी घरफोडी केल्याचेही यावेळी कबुली केले. त्यांच्याजवळून या दोन्ही गुन्ह्यातील एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिसांनी कलम ३७६ (२) (आय) भादंविच्या सहकलम ४, ६ अन्वये लहान मुलांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ मध्ये विनोद बाळू जाधव व सुनील राजू जाधव रा. वडर झोपडपट्टी, आर्वी नाका, या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघेही चोरी करण्याच्या उद्देशाने कुलूपबंद घराची पाहणी करीत होते. अशात त्यांना एक मुलगी फुले तोडत असताना दिसली. त्यांनी तिला निर्जन स्थळी नेवून तिच्यावर बलात्कार केला. या गुन्ह्यात दोघांना अटक केली असता हे दोन्ही आरोपी सराईत चोरटे असल्याचे समोर आले. या दोघांनाही पोलिसी खाक्या दाखविताच आरोपितांनी गोंडप्लॉट व स्वागत कॉलनी येथे चोरी केल्याची कबुली दिली. आरोपितांकडून गोडप्लॉट येथील चोरीतील रोख पाच हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण ४५ हजार २०० रुपयांचा माल तसेच स्वागत कॉलनी येथील चोरीस गेलेला सोन्याच्या ७ अंगठ्या २१ ग्रॅम, चांदीच्या चार वाट्या, चार मनगट्या, एक करदोडा असा एकूण ५४ हजार १५ रुपये एकूण किंंमत ९९ हजार २१५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम. पी. बुराडे, जमादार शेख नबी, प्रमोद जांभुळकर, गजानन लामसे, गजानन कठाणे, मनोहर मुडे, संजय राठोड, सचिन वाटखेडे, सचिन खैरकार यांनी केली.(प्रतिनिधी)