शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा कोरा होताच नव्या कर्जाचा बोझा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना करावा लागल्याने शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने शेतकऱ्यांना बँकाकडून नव्याने कर्ज मिळू शकले नाही. परिणामी, सावकरांच्या दारात जावून शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्ज घ्यावे लागले. होणारे उत्पन्न आणि सावकारी कर्जाचा जाच यातून शेतकरी मृत्यूशिवाय बाहेर पडूच शकला नाही.

ठळक मुद्दे४९ हजार ७०५ शेतकऱ्यांना मिळाला लाभ : माफीतील ४५ हजार ५८२ शेतकऱ्यांनी घेतले पुन्हा कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कर्जाच्या ओझ्यापायीच शेतकरी आत्महत्या करीत असल्याने या ओझ्यातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. पण, सातबारा कोरा होताच यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागल्याने त्यांच्या सातबारावर पुन्हा बोझा चढला. त्यामुळे कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्यांची काही सुटका होणे शक्य नाही, हे मात्र खरे.गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना करावा लागल्याने शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने शेतकऱ्यांना बँकाकडून नव्याने कर्ज मिळू शकले नाही. परिणामी, सावकरांच्या दारात जावून शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्ज घ्यावे लागले. होणारे उत्पन्न आणि सावकारी कर्जाचा जाच यातून शेतकरी मृत्यूशिवाय बाहेर पडूच शकला नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था लक्षात घेता राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ४९ हजार ७०५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला.या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४४१ कोटी ४२ लाख १७ हजार रुपये जमा करण्यात आले. कर्जमाफीचा लाभ मिळताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याने त्यांना बँकाकडून नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे कर्जमाफीतील ४९ हजार ७०५ शेतकऱ्यांपैकी ४५ हजार ५८२ शेतकऱ्यांनी नव्याने ४३८ कोटी ४२ लाख ६४ हजार रुपयांचे पीककर्ज घेतले आहे. माफीतील इतरही शेतकरी नव्याने कर्ज उचलण्याची शक्यता असून यामुळे कर्ज वाटपाचाही टक्का वाढणार आहे.दहा टक्के शेतकरी कर्जमाफीतून बाद?महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये २ लाखांपर्यंतचे सरसकट कर्ज माफ करण्याची घोषणा शासनाने करुन शेतकऱ्यांना लाभ ही दिला. पण, जिल्ह्यातील जवळपास दहा टक्के शेतकऱ्यांकडे पीककर्जाव्यतिरिक्त शेडनेट, पॉलीहाऊस, लॅण्ड डेव्हलपमेंट, सिंचन व्यवस्था आदींकरिता घेतलेले कर्ज थकीत असल्याने त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील या शेतकऱ्यांची आर्थिक अडचण आणखीच वाढली आहे. जिल्ह्यात शेडनेट व पॉलिहाऊस करीत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकºयांकडे गेल्या तीन ते चार वर्षांपासून कर्जाचे हप्ते फेडण्याची सोय नाही. त्यामुळे व्याजही वाढतच आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज