शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

थकलेल्या आईवरच शिक्षणाचे ओझे

By admin | Updated: June 25, 2014 23:56 IST

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांच्या अभ्यासाकडे वडिलांकडून

वर्धा : कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांच्या अभ्यासाकडे वडिलांकडून जास्त लक्ष दिले जात नसल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे. पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करणाऱ्या महिलाच मुलांच्या अभ्यासाची जास्त जबाबदारी पेलत असल्याचे यातून स्पष्ट होते.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना मुलांसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांबरोबर त्यांच्या पालकांचीही कसरत होत आहे, असे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले. घरात वडिलांना पूर्ण वेळ देता येत नसल्यामुळे आपल्या पाल्याची जबाबदारी नकळत आईवर येऊन पडते. मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. त्यामुळे शाळेतील शिक्षणाव्यतिरिक्त खासगी शिकवणीही लावली जाते. तसेच अनेक आई-वडील मुलांचा घरीही अभ्यास घेतात. मात्र, पालक म्हणून ही दोघांचीही समान जबाबदारी असताना मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांच्या शिक्षणाकडेही आईलाच लक्ष द्यावे लागते. त्यांचा गृहपाठ करून घेणे, त्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी ती प्रयत्न करीत असते. परंतु, काही वेळा बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांच्या अभ्यासातील अडचणी सोडवणे पालकांना कठीण जाते. त्यामुळे पालक खासगी शिकवण्या लावण्याला प्राधान्य देतात. सर्वेक्षणामध्ये तब्बल ७५ टक्के मुलांच्या बाबतीत असे आढळून आले, की मुलांचे आई-वडील नोकरी करतात. तर, ३५ टक्के मुलांचा अभ्यासही आईला घ्यावा लागतो. मुलांचा अभ्यास घेण्यात केवळ १० टक्के वडील सक्रिय असल्याचे समोर आले आहे. दोघेही मिळून अभ्यास घेणाऱ्या पालकांची टक्केवारी ३० टक्के आहे. सर्वेक्षणामध्ये सुमारे ७ मुलांचा अभ्यास घरी कोणीही घेत नसल्याचेही दिसून आले. या मुलांना शाळा आणि खासगी शिकवणीमध्ये घेतल्या जाणाऱ्या अभ्यासावरच अवलंबून राहावे लागत असल्याचे दिसते. (स्थानिक प्रतिनिधी)