असुविधांचा बाजार : ग्रामपंचायत प्रशासनाचा कानाडोळावर्धा : शहरालगतच्या ग्रामपंचायतींचे शहरीकरण होऊ लागले आहे. मोठा करही वसूल केला जात आहे. असे असले तरी सुविधा पुरविण्यात ग्रा.पं. प्रशासन कमकुवत ठरत आहे. परिणामी, नागरिकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. साटोडा ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या समर्थ नगरातही रहिवासी भाग झुडपांनी वेढला आहे. समर्थ नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा आहेत. या भागात झुडपे वाढली असून सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर आहे. परिणामी, तेथील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच राहावे लागत आहे. या परिसरातील झुडपांची गत कित्येक दिवसांपासून कटाई करण्यात आली नाही. ग्रा.पं. प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
समर्थ नगरीला झुडपांचा विळखा
By admin | Updated: October 17, 2016 01:00 IST