हिंगणघाट : येथील नांदगाव चौकातून शहरात येणाऱ्या उड्डाण पुलाजवळ दुचाकी वाहनातून शहराकडे येत असलेल्या एका युवकावर मारोती कारने येणाऱ्या युवकांनी शस्त्रासह हल्ला केला. यावेळी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी कट्ट्याने हवेत एक गोळी झाडण्यात आली. या हल्ल्यात सुदर्शन सुभाष गवळी (२६) हा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.जखमी सुदर्शन याला उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून अविनाश नवरखेडे याच्यावर भादंविच्या कलम ३०७, ३४ व हत्यार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.गत पाच ते सात महिन्यांपासून शहरातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड ते शास्त्री-कबीर वॉर्ड तसेच पुरपीडित वसाहतीत टोळीयुद्ध सुरू आहे. याची कल्पना पोलिसांना असताना सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे या भागात पोलिसांचा कुठलाही धाक नाही. अशातच दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास याच वादातून उड्डाण पुलाजवळ सुदर्शनवर अविनाश नवरखेडे व त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला. यात तो जखमी झाला. याच वेळी अविनाशने त्याच्याकडे असलेल्या देशी कट्ट्यातून सुदर्शनवर गोळी झाडली. ही गोळी सुदर्शनच्या पायाजवळून गेल्याने तो थोडक्यात बचाला. घटनेचही माहिती शहरात पसरली तरी पोलिसांना त्याची कल्पना नसल्याचे समोर आले आहे. सुदर्शनच्या गाडीवर असलेला सौरभ विजय उरकुडे हा किरकोळ जखमी झाला. यातील सर्वच आरोपी अद्याप फरार असून शोध सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)दारू विक्रीच्या व्यवसायातून युद्ध ४परिसरात दारू विक्रीचे कारण या वादाचे मूळ आहे. दबून असलेला हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या वादाने उग्र वळण घेतल्याने शहरात दशहत आहे.
हिंगणघाट येथे युवकावर गोळी झाडली
By admin | Updated: November 6, 2015 03:20 IST