शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

मुदत संपूनही इमारत बांधकाम सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:14 IST

सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. कराराप्रमाणे या इमारत बांधकामाचा कालावधी संपल्यानंतरही काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ही इमारत कधी पूर्णत्वास जाईल, असा प्रश्न उपस्थित होते आहे.

ठळक मुद्देभिंतीला तडे : रुग्णालय कर्मचारी निवासस्थानाचे काम संथगतीने

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. कराराप्रमाणे या इमारत बांधकामाचा कालावधी संपल्यानंतरही काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ही इमारत कधी पूर्णत्वास जाईल, असा प्रश्न उपस्थित होते आहे.सेलू येथे ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामसाठी ३४९.१५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून धुमधडाक्यात ३० मार्च २०१३ ला बांधकामाला सुरुवात झाली. कामाची गती पाहून कंत्राटदाराशी केलेल्या करारानुसार ३० एप्रिल २०१४ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्तविल्या जात होता. पण, या एक वर्षाच्या कालावधीत केवळ सुरक्षा भिंतच उभी राहिली. दोष दुरुस्ती असलेला २४ महिन्यांचा कालावधीत या इमारतीचे अर्धेही काम पूर्ण झाले नाही. तालुक्यातील रुग्णांना तत्काळ सेवा देता यावी म्हणून बांधकामास मंजुरी देण्यात आली. कोट्यवधींचा निधीही दिला, परंतु सहा वर्षांत ही इमारत पूर्णत्वास गेली नसल्याने आरोग्य सेवेविषयी शासकीय यंत्रणा किती उदासिन आहे, हे लक्षात येते. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्हया इमारतीचे सहा वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. काम कासवगतीने असले तरी कंत्राटदाराकडून बांधकामावर पुरेसे पाणी दिले जात नसल्याची ओरड होत आहे. पावसाचेच पाणी या इमारतीच्या बांधकामाकरिता पूरक ठरले आहे. परिणामी बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच सुरक्षा भिंंतीला जागोजागी गेलेले तडे निकृष्ट कामाचा परिचय करुन देत आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर ही भिंत या इमारतीची किती वर्ष सुरक्षा करेल, हे सांगणे कठीण आहे.