लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सात वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीच्या इमारतीची पडझड सुरू झाल्याने बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीच्या इमारतीच्या बांधकामाला २०१३ मध्ये सुरुवात झाली. सात वर्षे पूर्ण होत असतानाही या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे. अशातच दोन दिवस आलेल्या पावसाच्या सरी पाहता या इमारतीच्या खिडक्यांवर टाकलेला सज्जा कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, दर्शनी भागावर शिल्लक असलेल्या एका खिडकीवरील सज्जा पाहिल्यास हे बांधकामाच्या दर्जाच्या अंदाज येतो. या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू आहे.या पडझड होत असलेल्या इमारतीत कोविड सेंटर उघडले असून येथेच बाह्यरुग्ण विभागाचा नोंदणी विभाग आहे. ज्या वेळेस हा सज्जा पडला, त्या वेळेस कुणीही रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक या इमारतीजवळ नसल्याने अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे. या इमारत बांधकामाची असलेली कासवगती पाहता यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा दुर्लक्ष का करीत आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. निकृष्ट बांधकामाची चौकशी होणार काय, याकडे लक्ष लागले आहे.
काम पूर्ण होण्यापूर्वीच इमारतीची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST
सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीच्या इमारतीच्या बांधकामाला २०१३ मध्ये सुरुवात झाली. सात वर्षे पूर्ण होत असतानाही या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे. अशातच दोन दिवस आलेल्या पावसाच्या सरी पाहता या इमारतीच्या खिडक्यांवर टाकलेला सज्जा कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.
काम पूर्ण होण्यापूर्वीच इमारतीची पडझड
ठळक मुद्देग्रामीण रुग्णालय इमारत : बांधकामाच्या दर्जावर उपस्थित केले जातेय प्रश्नचिन्ह