लोकसहभाग वाढविण्याला प्राधान्य : सांसद आदर्श ग्राम योजना विकास कामांचा आढावासर्वांनी सहकार्य करा - रामदास तडसवर्धा : सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत तरोडा गावाचा सर्वांगीण विकास करताना ग्रामस्थ, अधिकारी व पदाधिकारी यांनी समन्वयाने काम करून तरोडा येथील विकासकामांचा आदर्श निर्माण होईल, यादृष्टीने कामांचे नियोजन करा. २०१६ पर्यंत पंतप्रधानांच्या संकल्पनेतील आदर्श गाव निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत तरोडा येथे राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, सरपंच सुनीता टिकले, उपसरपंच गणेश तिमांडे, अप्पर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, माजी सरपंच विनोद तिमांडे, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे आदी उपस्थित होते.सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत तरोड्याचा विकास करताना गावातील मूलभूत कार्यक्रमही प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. या कामांमध्ये तरोडावासायींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेणे आवश्यक आहे. विकासकामे करताना जोपर्यंत येथील जनतेचे सक्रीय सहकार्य व विकासकामांचा सहभाग मिळणार नाही तोपर्यंत योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि खऱ्या अर्थाने पूर्तता होणार नाही. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत तरोडा येथे सिमेंट बंधारा तसेच जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासोबतच गावातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण व गावात येणाऱ्या मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्याचा एक कोटीच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.तरोडा गावातील अतिक्रमणामुळे जनतेला होणाऱ्या असुविधेबद्दल तात्काळ अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करणे व खडीकरण करण्यासाठी तातडीने सहकार्य करावे, असे सरपंच सुनीता टिकले म्हणाल्या. गावात वृक्षारोपणासाठी लोकसहभाग वाढवावा व नरेगांतर्गत विविध कामांसाठी मजूर उपलब्ध करून देणर््याबाबतही यावेळी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. आदर्श ग्राम योजनेचा नेहमीच आढावा घेऊन विविध विभागाकडे सोपविण्यात आलेल्या कामांच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या.(शहर प्रतिनिधी)सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत तरोड्याचा विकास करताना गावातील मूलभूत कार्यक्रमही प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. या कामांमध्ये तरोडावासायींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेणे आवश्यक असल्याचे खासदार तडस यावेळी म्हणाले. विकासकामे करताना जोपर्यंत येथील जनतेचे सक्रीय सहकार्य व विकासकामांचा सहभाग मिळणार नाही तोपर्यंत योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि खऱ्या अर्थाने पूर्तता होणार नाही असेही ते म्हणाले.अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
जिल्ह्यात तरोडा विकासकामांचा आदर्श निर्माण करा
By admin | Updated: July 4, 2015 00:29 IST