शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

बसपा, वंचित फॅक्टर ठरला प्रभावहीन

By रवींद्र चांदेकर | Updated: June 6, 2024 20:31 IST

लोकसभा निवडणूक : मतांमध्ये घसरण, ही मते गेली कुठे ?

वर्धा : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली अन् बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये घसरण झाल्याचे समोर आले. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना गेल्यावेळीपेक्षा यावेळी कमी मते मिळाली. त्यामुळे ही ‘कॅडर’ बेस मते गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात असून बसपा आणि वंचित यावेळी प्रभावहीन ठरल्याचे दिसून येत आहे.

अठराव्या लोकसभेसाठी वर्धा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान आटोपले होते. तब्बल एक महिना नऊ दिवसानंतर ४ जून रोजी मतमोजणी झाली. त्यात शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे विजयी झाले, तर भाजपचे रामदास तडस पराभूत झाले. या दोघांच्या खालोखाल बसपा आणि वंचितच्या उमेदवारांनी मते घेतली. ‘बसपा’चे डॉ. मोहन राईकवार यांना तिसऱ्या क्रमांकाची २० हजार ७९५ मते मिळाली. ‘वंचित’चे प्रा. राजेंद्र साळुंखे १५ हजार ४९२ मते घेऊन चौथ्या स्थानी राहिले. मात्र, गेल्यावेळीपेक्षा बसपा आणि वंचितच्या उमेदवारांची मते घटली आहेत.२०१९ मध्ये बसपाचे उमेदवार शैलेशकुमार प्रेमकिशोर अग्रवाल यांना ३६ हजार ४२३ मते मिळाली होती. त्यावेळी वंचितचे उमेदवार धनराज कोठारी यांनाही ३६ हजार ४५२ मते मिळाली होती. या दोघांच्याही मतांची बेरीज ७२ हजार ८७५ होते. यावेळी बसपा आणि वंचितच्या उमेदवारांना एकूण केवळ ३६ हजार २८७ मते मिळाली आहे. अर्थात यावेळी २०१९ मध्ये बसपा आणि वंचितच्या एका उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षाही निम्म्यापेक्षा कमी मते मिळाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे बसपा आणि वंचितची कॅडर बेस मते नेमकी कुठे गेली, कुणीकडे वळली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार चेतन भीमराव पेंदाम यांना तब्बल ९० हजार ८६६ मते मिळाली होती. त्यावेळी वंचितचा उमेदवार रिंगणात नव्हता. एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. त्यात आम आदमी पार्टीचे उमेदवार मो. अलीम पटेल मो. वहीद यांनी १५ हजार ७३८ मते घेतली होती. तत्पूर्वी २००४ मध्येही बसपाचे उमेदवार साेमराज तेलखेडे यांनी ५४ हजार नऊ मते घेतली होती. आता ही मते कुठे वळली, हा संशोधनाचा विषय झाला आहे.बॉक्स

२००९ मध्ये लाखाच्यावर मतेवर्धा लोकसभा मतदारसंघात बसपा आणि वंचितची ७० हजारांच्यावर मते असल्याचे नेहमी सांगितले जाते. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही बाब स्पष्टही झाली आहे. त्यात २००९ मध्ये तर बसपाचे उमेदवार बिपीन कंगाले यांनी तब्बल एक लाख ३१ हजार ६४३ मते मिळवून बसपाची ताकद अधोरेखित केली होती. त्यावेळी विजयी झालेले काँग्रेसचे दत्ता मेघे यांना तीन लाख ५२ हजार ८५३, तर पराभूत झालेले भाजपचे सुरेश वाघमारे यांना दोन लाख ५६ हजार ९३५ मते मिळाली होती. मेघे यांनी वाघमारे यांचा ९५ हजार ९१८ मतांनी पराभव केला होता. विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरकापेक्षा कंगाले यांना तब्बल ३५ हजार ७२५ जादा मते मिळाली होती, हे विशेष. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर