शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या सदोष सेवेमुळे आॅनलाईन कामे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:24 IST

भारत संचार निगमच्या सदोष सेवेमुळे मागील पाच दिवसांपासून आॅनलाईन कामे ठप्प झाली आहेत. बँकेसह शासकीय कार्यालयात लिंक नसल्यामुळे मागील पाच दिवसांपासून दररोज बँकेसह ग्रामपंचायत व इतर संबंधित कामाकरिता नागरिकांना महत्त्वाची कामे सोडून कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : बँक आॅफ महाराष्ट्र, ग्रामपंचायतीतील लिंक फेल

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : भारत संचार निगमच्या सदोष सेवेमुळे मागील पाच दिवसांपासून आॅनलाईन कामे ठप्प झाली आहेत. बँकेसह शासकीय कार्यालयात लिंक नसल्यामुळे मागील पाच दिवसांपासून दररोज बँकेसह ग्रामपंचायत व इतर संबंधित कामाकरिता नागरिकांना महत्त्वाची कामे सोडून कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. असा प्रकार मागील तीन महिन्यांपासून सातत्याने सुरू असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.येथे एकमेव बँक आॅफ महाराष्ट्र असून दहा ते पंधरा गावांतील ग्राहक या बँकेशी जुळलेले आहे. त्यामुळे येथे ग्राहकांची दररोजच गर्दी असते. मागील शुक्रवारपासून लिंकफेलमुळे बँकेची सर्व कामे ठप्प झाली आहेत. ग्राहकांना त्यांचाच पैसा वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. तसेच ग्रामपंचायतीमधून विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र प्रदान केले जातात. परंतु, लिंक फेलमुळे ही कामेही प्रभावित झाली आहेत. एकंदरीत आॅनलाईन सोयीचे ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत सदोष सेवा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.आंजीतही लिंक फेलचा फटकाआंजी (मोठी)- येथील बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत मागील तीन दिवसांपासून लिंक फेल आहे. त्यामुळे ग्राहकांना परत जावे लागत आहे. या बॅँकेला परिसरातील दहा गावे जोडलेली आहे. मात्र, लिंक फेलमुळे कोणतेही व्यवहार होऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे.ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने नागरिकांना विविध प्रकारचे आॅनलाईन दाखले द्यावे लागतात. परंतु, लिंक फेलमुळे ही सर्व कामे प्रभावित झाली आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामावरसुद्धा मोठा परिणाम झाला आहे.-सुरेंद्र ढोक, ग्रामविकास अधिकारी, केळझर.

टॅग्स :BSNLबीएसएनएल