लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बीएसएनएलच्या आॅल युनियन्स असोसिएशनच्यावतीेने विविध मागण्यांकरिता तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला सोमवारपासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्वच कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी या संपात सहभागी झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच कार्यालयापुढे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. त्यामुळे तीन दिवस या कार्यालयातील कामकाज प्रभावित होणार आहे.सरकारच्या धोरणामुळे तसेच दूरसंचार मंत्रालयाच्या उदासिनतेमुळे अनेक कर्मचारी व अधिकारी अडचणीत आले आहे. हायस्पीड ४ जी स्पेक्ट्रमचे वितरण जियोसह खासगी कंपनींना केले. परंतु भारतीय दुरसंचार निगम ही सरकारी कंपनी असतानाही ४ जी स्पेक्ट्रमचे वितरण केले नाही. यासह अनेक समस्यांबाबत बीएसएनएलचे कर्मचारी व अधिकारी सरकारकडे मागण्या करीत आहे. परंतु दूरसंचार मंत्रालयाकडून आश्वासनच पदरी पडत असल्याने कर्मचाºयांनी १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान तीन दिवसीय संप पुकारला आहे. या संपाची सुरुवात धरणे आंदोलनाने करण्यात आली. प्रारंभी सर्व अधिकारी व कर्मचाºयांंनी पुलवामा येथील घटनेचा निषेध नोंदवून शहिदांना ऋद्धांजली वाहिली. यावेळी आॅल युनियन्स असोसिएशनचे समन्वयक अक्रम पठाण, सचिव रमेश इटनकर, नरेंद्र साळवे, इफ्तेखार शेख, रविंद्र सातकर, स्नेहा, हितेंद्र चव्हाण, संजय दरे, विनोद इंगळे यांच्यासह २८ अधिकारी व १२९ कर्मचारी उपस्थित होते.
बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा तीन दिवस संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:51 IST
बीएसएनएलच्या आॅल युनियन्स असोसिएशनच्यावतीेने विविध मागण्यांकरिता तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला सोमवारपासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्वच कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी या संपात सहभागी झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच कार्यालयापुढे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. त्यामुळे तीन दिवस या कार्यालयातील कामकाज प्रभावित होणार आहे.
बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा तीन दिवस संप
ठळक मुद्देकामकाज ठप्प : वर्धेतील कार्यालयापुढे दिले धरणे