मागणी प्रलंबितच : दळणवळण गतिमान करण्यास होईल मदतपंतप्रधानांना निवेदनातून साकडेआर्वी : पुलगाव-आर्वी हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करुन वरुड रेल्वेमार्गाला जोडण्यात यावा, ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. शासनाकडून या दिशेने कोणतेच कार्य होत नसल्याने येथील नागरिकांना बससेवेवर अवलंबून राहावे लागते. परिसरातील दळणवळणाला गतिमान करून उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.याबबात भाजपा व्यापारी आघाडीचे सूर्यप्रकाश भट्टड व शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री प्रभू व मुख्यमंत्री यांना निवेदनातून केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले.विदर्भ विकासाच्यादृष्टीने व औद्योगिक व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने पुलगाव-आर्वी ही ३५ कि़मी. नॅरोगेज लाईन टाकण्यात आली होती. ब्रिटीश काळात म्हणजेच १८८५-८६ मध्ये या मार्गाचे काम झाले. आर्वी उपविभागात अनेक जिनींग व प्रेसींग असून आर्वी ही कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील रुई व रुईगाठी विदेशात पाठविण्यासाठी या नॅरोगेज रेल्वेचा त्याकाळात वापर मोठ्या प्रमाणात केल्या जात होता. पुलगाव-आर्वी-वरुड हा मार्ग पुढे नागपूर-आमला मार्ग व मुंबई-दिल्ली, कोलकाता या मार्गाला जोडल्या होता. कालांतराने रेल्वेचा विस्तार झाल्याने हा मार्ग मागे पडला. या परिसरातील या रेल्वे मार्गामुळे आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, रोहणा, पांढुर्णा, वरुड आदी तालुक्यातील ९०० गावाना या रेल्वेमार्गाचा लाभ होऊ शकतो. परंतु याकडे आजवर दुर्लक्ष झाल्याने ही मागणी प्रलंबित आहे. याची दखल घेत कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून संबंधितांना करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)पुलगाव-आर्वी रेल्वे मार्ग ब्रॉडग्रेज करण्याबाबत मुख्य अभियंता मध्य रेल्वे विभाग, अजनी(नागपूर) यांनी निविदा सूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने हे काम रेंगाळले. पुलगाव-आर्वी या रेल्वेमार्गावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी आहे. मात्र निधी अभावी पुलाचे काम रखडले आहे. या रेल्वेमार्गाला आमला पर्यंत जोडल्यास दिल्ली मार्गे रेल्वे वाहतूक सुरू होऊ शकते. याची दखल घेण्याची गरज आहे.
पुलगाव-आर्वी रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करा
By admin | Updated: July 4, 2015 00:22 IST