शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चर्चासत्रात मृदा आरोग्यावर मंथन

By admin | Updated: December 11, 2015 02:53 IST

कृषी विज्ञान केंद्र, वर्धा तसेच कृषी विभाग, वर्धा आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी येथील नगर भवनात शेतकऱ्यांच्या उपस्थित चर्चासत्र पार पडले.

नवतंत्रज्ञानावर भर : मृदा संवर्धनाचे धडेवर्धा : कृषी विज्ञान केंद्र, वर्धा तसेच कृषी विभाग, वर्धा आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी येथील नगर भवनात शेतकऱ्यांच्या उपस्थित चर्चासत्र पार पडले. यात मृदा संवर्धनावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सभापती श्यामलता अग्रवाल होत्या तर उद्घाटक नगराध्यक्ष शोभा तडस होत्या. अतिथी म्हणून प्रशांत तिंगावकर, नगरपरिषद उपाध्यक्ष विजय गोमासे, आदमने, कुरडकर, लाभे यांची उपस्थिती होती. या मातीतून मानवाने आजवर असधारण गरजा भागविल्या. परंतु या गरजा भागविताना मातीचे आरोग्य जपण्याची जबाबदारीचा आपल्याला विसर पडला. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन घेत पोषक घटकांची आवश्यकतेनुसार पूर्तता करीत विकसीत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मृदा संवर्धन शक्य आहे, असे मत समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे यांनी यावेळी व्यक्त केले.मार्गदर्शक म्हणून मृदाविज्ञान व रसायनशास्त्र विभाग व कृषी महाविद्यालय, नागपूर चे आर.एम. घोडपाणे, जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी रश्मी जोशी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्प संचालक दीपक पटेल, पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. प्रदीप दवने, तालुका कृषी अधिकारी जे.एस. ब्राम्हणे, विषयतज्ज्ञ प्रा.उज्वला सिरसाट, गटतंत्र व्यवस्थापक निरंजन वराडे यांचा सहभाग होता. पहिल्या सत्रात ईसापूर येथील दुग्ध उत्पादक शेतकरी नरेश ढोकणे यांनी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात रश्मी जोशी यांनी माती परिक्षण आणि खत व्यवस्थापनाविषयी तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रवीण भुजाडे, मस्कर, संदीप कांबळे, कर्मचारी वृंद, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वर्धा येथील गटतंत्र अधिकारी व सहकारी, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी सहकार्य केले. आभार वराडे यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)