शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समाज मेळाव्यातून सामाजिक समस्यांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:28 IST

देशात आज अनेक समस्या डोके वर काढत असताना त्यांची झळ सर्वच समाजांना पोहोचत आहे. आर्थिक कोंडी, उपवर मुला-मुलींचे विवाह, परस्परांपासून दुरावलेली मने, शैक्षणिक समस्या, समाज एकत्रिकरण आदी अनेक समस्या आहे.

ठळक मुद्देतिरळे कुणबी वर-वधू परिचय मेळाव्याचा सूर : अन्य समस्यांवरही तोडगा काढण्याची व्यक्त केली गरज

ऑनलाईन लोकमतपुलगाव : देशात आज अनेक समस्या डोके वर काढत असताना त्यांची झळ सर्वच समाजांना पोहोचत आहे. आर्थिक कोंडी, उपवर मुला-मुलींचे विवाह, परस्परांपासून दुरावलेली मने, शैक्षणिक समस्या, समाज एकत्रिकरण आदी अनेक समस्या आहे. समाजातील एकटा घटक आलेल्या समस्यांना तोंड देऊ शकत नाही. यासाठी समाज मेळाव्यातून सामाजिक समस्यांवर मंथन होऊन उपवर वर-वधूसह अन्य समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे आहे, असा सूर तिरळे कुणबी समाज मेळाव्यातून निघाला.स्थानिक तिरळे कुणबी समाज सेवा संघातर्फे तिरळे कुणबी वधू-वर परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या विदर्भस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वर्धा येथील ओंकार धावडे तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश सावरकर, निवृत्त कर्मचारी पेन्शन १९९५ या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पुंडलिक पांडे, प्रभाकर शहाकार, प्राचार्य राजेंद्र येवले, पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे, नितीन कोठे, गणपत चौधरी महाराज, अ‍ॅड. छाया छांदे, अशोक निकम, पं.स. सदस्य पल्लवी ढोक, रूपराव ठाकरे, विकास ढोक, संघाचे अध्यक्ष प्रशांत डफळे, तिवरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका तथा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुंडलिक पांडे, रमेश सावरकर, प्रभाकर शहाकार, मुरलीधर बुराडे, पल्लवी ढोक, आदींनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत डफळे यांनी प्रास्ताविकातून समाजातर्फे बांधण्यात येणाºया संत शिरोमणी तुकाराम महाराज समाज मंदिरासाठी जागा दान दिल्याची माहिती देत समाजकार्याची माहिती दिली. यावेळी समाजातील अनेक दात्यांनी मदतीचा हात पूढे केला.मेळाव्याला शेकडो पालक व उपवर मुला-मुलींची उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक उपवर मुला-मुलींनी आपला परिचय देत योग्य जीवनसाथी निवडीचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजा भवानी, संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तथा मार्ल्यापण, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. संचालन अरविंद उगले यांनी केले तर उपस्थितांचे आभार संगीता कुडे यांनी केले. याप्रसंगी स्वराश्रम कलामंचचे सुनील कुडे यांनी सुगम संगीत सादर केले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरिता शरद येंडे, प्रशांत कुडे, आशिष भोयर, रणजीत काकडे, चंद्रकांत भोयर, सुशांत बिरे, दिनेश गावंडे, राजेंद्र दरणे, नंदकिशोर मोहोड, दिनेश खेडकर, राजू वानखेडे, सतीश पांडे, दामोदर गोतमारे, महादेव भोयर, विनोद भेंडे, विजय भांडे, महेश भोयर, सचिन चौधरी, संजय गावंडे, गोरे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका व दिनदर्शिकेचे विमोचनतिरळे कुणबी समाज सेवा संघातर्फे आयोजित उपवर वर-वधू व पालक परिचय मेळाव्यात स्मरणिका तथा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात वर-वधू तथा पालकांची माहिती दिली आहे.