लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भरधाव कार वन्य प्राणी आडवे आल्याने अनियंत्रित होऊन किमी दगडावर व झाडावर आदळली. या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात कानगाव ते वर्धा मार्गावरील बोरगाव (आलोडा) शिवारात बुधवारी रात्री झाला.चालक संतोष कृष्णराव काळे (६०) रा. औरंगाबाद व सतीश चंद्रकांत वडतकर (५०) रा. कान्होली (कात्री), अशी मृतकांची नावे आहे.कार क्र. एमएच १५ सीएम ४२१५ ने दोघेही कानगाव येथून वर्धेकडे येत होते. भरधाव कारला बोरगाव शिवारात वन्य प्राणी आडवा गेला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व कार किलोमीटरच्या दगडावर तथा झाडावर जाऊन आदळली. यानंतर कार उलटली. या अपघातात संतोष काळे व सतीश वाडतकर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ठाणेदार साही यांच्या मार्गदर्शनात प्रशांत भाईमारे तपास करीत आहेत. संतोष काळे यांचे कानगाव येथील शेत मक्त्याने दिले असून त्याचे पैसे घेण्याकरिता ते गावात आले होते, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:21 IST
भरधाव कार वन्य प्राणी आडवे आल्याने अनियंत्रित होऊन किमी दगडावर व झाडावर आदळली. या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले.
कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
ठळक मुद्देबोरगाव (आलोडा) येथील घटना