शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासन आदेश डावलून बोंडअळीचे अनुदान कर्जखात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:37 IST

येथील बँक आॅफ इंडिया शाखेने शासनाचे आदेश डावलून बोंडअळीचे अनुदान कर्जखात्यात वळते केले. याची माहिती शेतकऱ्याने आ. डॉ. पंकज भोयर यांना दिली.

ठळक मुद्देबँक आॅफ इंडियातील प्रकार : आमदारांकडून व्यवस्थापकाची कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणी : येथील बँक आॅफ इंडिया शाखेने शासनाचे आदेश डावलून बोंडअळीचे अनुदान कर्जखात्यात वळते केले. याची माहिती शेतकऱ्याने आ. डॉ. पंकज भोयर यांना दिली. यावर मंगळवारी आमदारांनी हिंगणी गाठत या बँक व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी हा प्रकार उघड करणाºया बोरी येथील शेतकºयांचीही उपस्थिती होती.८ जून रोजी जिल्हाधिकाºयांनी सर्व बँक व्यवस्थापकांची बैठक घेतली. या बैठकीला आमदारांचीही उपस्थिती होती. यावेळी शेतकºयांना पीक कर्ज देताना ना हरकत प्रमाणपत्र मागू नये, शासनाने दिलेल्या अनुदानाची कपात कर्ज खात्यात करू नये, कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना त्वरीत कर्जाचे वितरण करावे तसेच शेतकºयांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशा सूचना केल्या होत्या. असे असताना येथील बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापकाने या सूचनांचे उल्लंघण केल्याचे समोर आले.बोरी येथील शेतकरी नेताजी कोकाटे व बबनराव सातोकर यांच्या बँक खात्यात बोंडअळीचे अनुदान जमा झाली. ही रक्कम काढून बी-बियाणे आणण्याचा त्यांचा मानस होता. जमा रक्कम काढण्याकरिता शेतकरी बँकेत गेले असता त्यांनी तुमची जमा झालेली रक्कम मदतनिधी खात्यात जमा करण्यात आली, असे सांगण्यात आले. तेव्हा कोेकाटे यांनी आमदार आणि जिल्हाधिकाºयांना व्यवस्थापकांना दिलेले माहिती व्यवस्थापकाला दिली. तरीही व्यवस्थापक ऐकून घेण्यास तयार नव्हते. शेवटी आ.डॉ. पंकज भोयर यांना बँकेच्या व्यवस्थापकांनी शेतकºयांचे बोंडअळीचे अनुदान कर्जामध्ये कपात केल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकºयांकडून त्यांनी असे लिहून घेतल्याचा प्रकार उघड झाला. या सर्व प्रकारामुळे बँक व्यवस्थापकाला आमदारांनी चांगलेच धारेवर धरले.यावेळी अशोक मुडे, विलास वरटकर, सुधाकर नाईक, अरूण कौरती, आशिष कांबळे, शकील शेख, दत्तू तडस, रफीक शेख, रवी खडगी, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थिती होती.खासगी कर्जाची बँक व्यवस्थापकाला चिंतासेलू तालुक्यातील हिंगणी बँक आॅफ इंडिया शाखेंतर्गत महिला शेतकºयाने शेती कामासाठी कर्ज घेतले होते. या महिलेला छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळणे आवश्यक होते. मात्र या महिलेच्या पतीने फायनान्स कंपनीकडून आॅटो खरेदीसाठी कर्ज घेतले. त्यामुळे हिंगणी येथील शाखा व्यवस्थापकाने शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ महिला शेतकºयाला दिला नाही. अशी माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांच्या भेटी दरम्यान उघडकीस आली. फायनान्स कंपनीच्या कर्जाची शेतकºयापेक्षा अधिक चिंता करणाºया या व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी आमदारांकडे केली.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस