शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘बोर’ अन् ‘धाम’ देणार रबी हंगामात शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या.

ठळक मुद्देपाठबंधारे विभागाने केले उपलब्ध पाण्याचे नियोजन : पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षी अल्प पाऊस झाल्याने हिवाळ्याच्या दिवसातच उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले होत. त्यावेळी सिंचनासाठी नाममात्र पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु, यंदा पावसाच्या दिवसात जलाशयांमधील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. बोर प्रकल्प ८०.९९ टक्के तर धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून रबी पिकांना वेळीच पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने या दोन्ही जलाशयांमधून पाटबंधारे विभाग मुबलक पाणी सोडणार आहे. तसे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे.उन्हाळ्याच्या दिवसात महाकाळी येथील धाम प्रकल्प मृत जलसाठ्यावर आल्याने वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. तर बोर प्रकल्पातही नाममात्र जलसाठा शिल्लक राहिल्याने सेलूसह परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. बोर नदीचे पात्र कोरडे झाल्याने तसेच सेलूतील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याने सेलू नगरपंचायतीच्या मागणीला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाने बोर प्रकारातील १ दलघमी पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सोडले होते. तर वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमध्ये भीषण जलसंकट तयार झाल्याने धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचलही करण्यात आली होती. एकूणच उपलब्ध जलसाठा पाऊस सुरू होईपर्यंत कसा पुरविता येईल यासाठी नियोजन करताना सिंचनासाठी सोडण्यात येणाºया पाण्यात बºयापैकी कपात त्यावेळी करण्यात आली होती. पण, सध्या बोर प्रकल्प ८०.९९ टक्के तर धाम प्रकल्प १०० टक्के भरल्याने यंदा सिंचनासाठी मुबलक पाणी शेतकऱ्याना मिळणार आहे. तसे नियोजनही वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शिवाय तसा प्रस्ताव अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. असे असले तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर होणे गरजेचे आहे.बोरचा १०,५०० हेक्टर तर धामचा ३,९८५ हेक्टरला होणार लाभरबी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना सिंचनासाठी वेळीच पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. रबी हंगामातील पिकांना सिंचनासाठी बोर प्रकल्पातून ७० दलघमी तर धाम प्रकल्पातून ३१.८८ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. धाम मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा ३ हजार ९८५ हेक्टरवरील पिकांना तर बोर मधून सोडण्यात येणाºया पाण्याचा १० हजार ५०० हेक्टरवरील पिकांना लाभ मिळणार आहे.धाम मधील १२.८७ दलघमी पाणी पिण्यासाठी राखीवउन्हाळ्याच्या दिवसात धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची उचल करून वर्धा शहरासह १३ गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यात आली होती. तर यंदा पावसाळ्यात हा जलाशय १०० टक्के भरल्याने उपयुक्त जलसाठ्यापैकी १२.८७ दलघमी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे औद्योगीक वापरासाठी या प्रकल्पातून ३.१३ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Bor Damबोर धरण