शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून रोख पळविणाऱ्यास ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:37 IST

मारहाण करून २५ हजारांची रोख पळवून नेणाºयास समुद्रपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात हूडकून काढत जेरबंद केले आहे. सदर आरोपीपासून पोलिसांनी चोरीतील रोख व इतर साहित्य जप्त केले आहे.

ठळक मुद्देचोरीचा मुद्देमाल जप्त : समुद्रपूर पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : मारहाण करून २५ हजारांची रोख पळवून नेणाºयास समुद्रपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात हूडकून काढत जेरबंद केले आहे. सदर आरोपीपासून पोलिसांनी चोरीतील रोख व इतर साहित्य जप्त केले आहे.प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर येथील अविनाश वायकोर हे नागपूर येथून चंद्रपूरकडे कारने जात असता ते चहा घेण्यासाठी जाम येथे थांबले. वाहन उभे करीत असताना अभिजीत वरोकर हा तेथे आला. त्याने मलाही चंद्रपूरला सोबत घेऊन चला असे सांगितले. परंतु, त्याच्याकडे दारूसाठा असल्याने वायकोर यांनी त्याला सोबत घेण्यास नकार दिला. कारमध्ये मला का सोबत घेत नाही, असे म्हणत अभिजित वरोकर याने अविनाश याच्याशी वाद करून तक्रारकर्त्यासह तक्रारकर्त्यांच्या मित्राला मारहाण करून त्यांच्या जवळील २५ हजारांची रोख चोरून पळ काढला. या प्रकरणी अविनाश वायकोर यांच्या तक्रारीवरून समुद्रपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, आशीष गेडाम, वैभव चरडे यांच्या मदतीने जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातून आरोपीला हुडकून काढत त्याला जेरबंद केले. शिवाय त्याच्याकडून चोरीची रक्कम जप्त केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, रवी वर्मा, वैभव चरडे, आशीष गेडाम आदींनी केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर करीत आहेत.

टॅग्स :Thiefचोर