शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

खडकाळ जमिनीवर फुलविले हिरवे स्वप्न

By admin | Updated: January 24, 2016 01:57 IST

प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, या सार्थ उक्तीप्रमाणे चामला येथील शेतकऱ्याने आपल्या दहा एकर खडकाळ शेतात अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर हिरवे स्वप्न फुलविले.

चामला गावातील यशोगाथा : खडकांचे सात थर फोडून खोदल्या पाच विहिरीअमोल सोटे आष्टी (श.)प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, या सार्थ उक्तीप्रमाणे चामला येथील शेतकऱ्याने आपल्या दहा एकर खडकाळ शेतात अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर हिरवे स्वप्न फुलविले. प्रामाणिकता, जिद्द, चिकाटी व परिश्रमाचा त्यांनी आगळाच आदर्श घालून दिला आहे. रेड झोन व डोंगरमाथ्यावर वसलेले चामला गाव. येथे वर्षभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अशा कठीण परिस्थितीत ७० वर्षीय शंकर मदनकर यांनी स्वत:च्या दहा एकर शेतीला दगडाच्या संघर्षातून फुलविण्याचा निर्धार केला. यासाठी श्रीकृष्ण, हरिष व सुरेश या तीन मुलांना सोबत घेऊन २००३ मध्ये शेतात पहिली विहिर खोदली. ८० फुट खोलवर दगड खोदून पाणी लागले. एका विहिरीच्या खोदकामाला ३ वर्षे लागलीत. दगडांचे थर लागले; पण ते हिंमत हरले नाही. ७२ फुटावर मऊ भाग लागला आणि पाणी मुबलक मिळाल्याने त्यांचे समाधान झाले.यानंतर शासकीय योजनांच्या मागे न लागता कष्टाच्या पैशातून संत्र्याची ३०० झाडे लावली. दगड व मुरूम यात कसे खड्डे खोदायचे याचा सतत विचार; पण यावरही मात केली आणि प्रयत्नांना यश आले. संत्रा बगिच्याची देखभाल व्यवस्थित केल्याने २०११ पासून दरवर्षी २ ते ३ लाख रुपयांत बगिचाची विक्री होते. सोबतच कपाशी, तूर, सोयाबीन, मिरची भाजीपाला आदी पिके त्यांनी घेतली. यात नफा मिळाला; पण सिंचनासाठी पाणी कमी पडत होते. यामुळे २००७ मध्ये त्यांनी दुसरी विहिर खोदली. २०११ मध्ये आणखी दोन विहिरी खोदल्या. पैकी दोनच विहिरींना पाणी लागले. अखेरचा उपाय म्हणून आणखी एक विहीर खोदण्यास गतवर्षी सुरूवात केली. सध्या ५५ फुट खोदकाम झाले. आता मऊ भाग व पाणी लागले. या पाण्यातून नवीन संत्राची ३०० झाडे तयार करीत आहे.वनविभागाचा सर्व्हे शेताला लागून आहे. मोजणी झाली तेव्हा वनकर्मचारी शंकरच्या शेतात आले. तीन एकर शेती वनविभागाच्या हद्दीत आहे, असा दम दिला. याला न घाबरता त्यांनी न्यायालयात धाव घेतली. माझा हक्क न्यायालय मिळवून देईल, यावर विश्वास असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. एका तपापासून सुरू आहे संघर्षगावापासून अर्धा किमी अंतरावर शेती आहे. वन्यप्राण्यांचा हैदोस असल्याने दररोज कुटुंबातील एका सदस्याला शेतात रक्षणासाठी जावे लागते. ऊन्ह, वारा, पाऊसासोबत १२ वर्षांचा संघर्ष आजही जिद्दीने सुरू आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही शेती प्रेरणा व नवीन दिशा देणारी ठरत आहे. कृषी विभागाचे आणखी तांत्रिक मार्गदर्शन लाभल्यास शेतीचे नंदनवन होऊ शकेल.शेतकऱ्यांना शासन विविध योजनांचा लाभ देतात. चामला येथील शेतकरी शंकर मदनकर यांच्या शेताला भेट देऊन ईस्त्राईल पद्धतीच्या संत्रा लागवडीस प्रोत्साहित करणार आहे.- अरुण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.खडकाळ भागात विहिरीचे खोदकाम करताना त्रास झाला; प्रामाणिक कष्टाने फळ मिळाले. मी व माझी तीनही मुले दिवसभर शेतीला वेळ देतो. यामुळे आर्थिक बाजू भक्कम झाली.- शंकर मदनकर, शेतकरी, चामला.