शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचे ऋण फेडण्याची रक्तदान हीच संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

कोरोना संकटाच्या काळातही राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या वतीने संपूर्ण राज्यभर ‘लोकमत - रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेऊन ठिकठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून हिंगणघाट येथील साई सभागृह, नंदोरी रोड, हिंगणघाट येथे शनिवारी महारक्तदान शिबिर पार पडले.

ठळक मुद्देवांदिले : हिंगणघाट येथील महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक श्रद्धेय स्व. स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या  जयंतीनिमित्त  साई सभागृह, नंदोरी रोड, हिंगणघाट येथे आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या हस्ते झाले. आपण दान केलेले रक्त एखाद्याचे प्राण वाचवू शकते; त्यामुळे कोविड संकटकाळात प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करणे महत्त्वाचे असून, समाजाचे ऋण फेडण्याची खरी संधी ही रक्तदानातून मिळते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी रक्तदान करावे, असे प्रतिपादन अतुल वांदिले यांनी याप्रसंगी केले.कोरोना संकटाच्या काळातही राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या वतीने संपूर्ण राज्यभर ‘लोकमत - रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेऊन ठिकठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून हिंगणघाट येथील साई सभागृह, नंदोरी रोड, हिंगणघाट येथे शनिवारी महारक्तदान शिबिर पार पडले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी भास्कर कलोडे यांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वितेकरिता मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, रमेश घंगारे, उमेश नेवारे, मारोती महाकाळकर, जगदीश वांदिले, राजू सिन्हा, बच्चू कलोडे, प्रशांत एकोणकर, निखिल भुते, नरेश चिरकुटे, अमोल मुडे, गोलू भुते, गोपाल कांबळे, हरीश वाघ, जितू रघाटाटे, मिथुन चव्हाण, राजू खडसे, आदींनी सहकार्य केले. रक्तसंकलनाचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीतील चमूने केले.

रक्तदानातून यांनी अर्पण केली आदरांजली

-  हिंगणघाट येथील शिबिरात रूपेश लाजूरकर, दीपक चंदनी, कीर्तिकुमार ठाकरे, आशिष ठाकरे, सुनील मेश्राम, सचिन कापसे, मयूरी कापसे, दीपक धात्रक, विश्रांती कुटेवार, अनिकेत हिवाळे, विक्रम सैनी, रामेश्वर बावणे, अमित नागपुरे, सचिन भडे, संदीप रोडे, सागर सहारे, धीरज कोल्हे, आकाश पिल्लेवार, नीलेश कोयचाडे, विपिन रेवतकर, नीलेश शेंडे, आशिष कापकर, संदीप भोयर, अनंता माडे, पंकज परटक्के, योगीता कावळे, नितीन काळे, अमोल मुळे, सर्वेश सोनकुसरे, शुभांगी धकाते, अक्षय पोटफोडे, राजू मुडे, अनिल सूर्यवंशी, आदींनी रक्तदान करून श्रद्धेय बाबूजींना आपली आदरांजली अर्पण केली. 

आज सेलू येथे रक्तदान शिबिर- ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत आज, रविवारी कुंभारे सभागृह, शीतलदास मठ, मेन रोड, सेलू येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू रक्तसंकलन करणार आहे.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट