भरारी पथकाच्या भेटीत उघड : तहसीलदारांना अहवाल सादरआकोली : मतदार नोंदणी अभियान राबविले जात असून नियुक्त बीएलओ हे कार्य पार पाडत आहे. रविवारी विशेष मोहीम असल्याने येथील नोंदणी केंद्राला अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट दिली. यात ग्रामसेवक रमेश शहारे गैरहजर आढळले. याबाबतचा अहवाल तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांना सादर करण्यात आला आहे. आगामी काळात जि.प. व पं.स. च्या निवडणुका होणार आहेत. जानेवारी २०१७ ला वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक, युवतींना मतदार यादीत नाव नोंदवायचे आहे. यासाठी आकोली येथे शिक्षिका पुनम पाबळे व ग्रामसेवक रमेश शहारे यांची बुथ मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. रविवारी निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या दिवशी हजर राहून अर्ज स्वीकारणे बंधनकारक होते. मतदार नोंदणी अधिकारी दांडी मारत असल्याची व आदर्श आचार संहितेचे काहींकडून उल्लंघन केले जात असल्याचे तहसीलदार डॉ. होळी यांच्या निदर्शनास आले. यावरून त्यांनी स्थानिक स्तरावर नायब तहसीलदार नगराळे व मंडळ अधिकारी डेहणे यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार केली. दोन्ही पथकाने आकोली गावाला वेगवेगळ्या वेळी भेटी दिल्या असता बीएलओ शिक्षिका पुनम पाबळे हजर तरा दुसरे बीएलओ ग्रामसेवक रमेश शहारे दोन्ही वेळा गैरहजर होते. दसरा सणानिमित्त गावात आलेल्या बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना नावे नोंदविता आली नाही. यामुळे ते मतदानापासून वंचित राहणार आहे. ग्रामसेवकाचे हे कृत्य आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे.(वार्ताहर)
विशेष मोहिमेला बीएलओची दांडी
By admin | Updated: October 13, 2016 01:24 IST